अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल; अँजिओप्लास्टी करण्यात आली!

अभिनेता श्रेयस तळपदे याला वयाच्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला आहे. सध्या ते रुग्णालयात दाखल असून अभिनेत्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

    सिनेसृष्टीतुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका (actor shreyas talapade suffer haeart attack) आला असुन त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्रेयसवर तातडीने अँजिओप्लास्टी देखील करण्यात आली  आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. अंधेरी येथील बेलेव्ह्यू हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहे.

    शूटिंग नंतर आला हृदयविकाराचा झटका

    रिपोर्ट नुसार, श्रेयस सध्या मुंंबईत त्याच्या वेलकम टू द जंगल या चित्रपटाचे शूटिंग करत असून या चित्रपटाच्या शूटिंगनंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला. चित्रपटाच्या शूटिंगनंतर जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याने पत्नीला सांगितले की त्याला अस्वस्थ वाटत आहे. यानंतर त्याच्या पत्नीने त्याला रुग्णालयात घेऊन गेली. मात्र,वाटेतच  त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असुन त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

    श्रेयस तळपदेचे चित्रपट

    श्रेयस तळपदेने अनेक मराठी हिंदी चित्रपटांमधे काम केलं आहे. त्याने त्याच्या आतपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये 45 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. सध्या तो वेलकम टू जंगल या चित्रपटामध्ये काम करतोय. वेलकम टू सज्जनपूर आणि इक्बाल हे त्याचे सर्वाधिक चर्चेत असलेले चित्रपट आहेत. याशिवाय त्याने शाहरुख खानसोबत ओम शांती ओम, जोकर सारखे चित्रपट केले आहेत. हाऊसफुलमधील श्रेयसच्या कामाचेही खूप कौतुक झाले.