राज्यात मतदानाचा उत्साह, सुबोध भावे, श्रुती मराठेसह अनेक कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क!

राज्यात आज लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. सुबोध भावे, श्रुतिका मराठे, आर्या आंबेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

  देशात सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९६ लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. अनेक नेते, अभिनेते आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. पुण्यात आज अभिनेता सुबोध भावेने पत्नीसह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यासोबतच अभिनेत्री श्रुती मराठे,गायिका आर्या आंबेकर यांनीही मतदान केलं. या कलाकारांनी मतदान केल्यांनतर सोशल मीडियावर फोटो शेअर करत इतरांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
  राज राज्यातील जळगाव, नंदुरबार, रावेर, जालना, मावळ, औरंगाबाद, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघांत मतदान पार पडत आहे. सकाळपासूनच नागरिक मोठ्या उत्साहात मतदानासाठी बाहेर पडताना दिसत आहेत.  अभिनेता सुबोध भावेनेही पत्नीसह पुण्यातील मतदान केंद्रावर मतदान केलं.
  मतदान केल्यानंतर सुबोध भावेने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. बोटावरील निळी शाई दाखवत सुबोधने मतदानाचं महत्त्व पटवून दिलं आहे.  “लोकशाहीचा हा उत्सव साजरा करूया,मतदान करूया! आम्ही करून आलो,तुम्हीही करा! जय हिंद!”, असं सुबोधने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

  काय म्हणाला सुबोध भावे

  मतदान केल्यानंतर सुबोध म्हणला की, आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा मतदान करायला मिळालं तेव्हा मला सर्वात जास्त आनंद झाला होता. तेव्हापासून कुठलीही निवडणूक असली तरीही मी आणि माझ्या घरातले सर्वजण मतदान करतो. मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे, याची जाणीव आम्हाला आहे. जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा असं मी मतदारांना आवाहन करीन, कारण तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकेल, असे सुबोध भावेने म्हटलं.
  सुबोधबरोबरच आर्या आंबेकर, नेहा महाजन, श्रुती मराठे यांनीही कुटुंबातील सदस्यांसोबत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. ‘ मी केलयं मतदान, तुम्ही केलं का’ असं कॅप्शन देत श्रुतीने इन्ट्राग्रामवर फोटो शेअर केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shrutii Marrathe (@shrumarathe)

  प्रत्येक मत महत्त्वाचं आहे असं म्हणत गायिका आर्या आंबेकरने देखील मतदान केल्यानंतर सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Aarya Ambekar (@ambekaraarya)