अभिनेता अल्लू-अर्जुन, ज्युनिअर एनटीआरने हैदराबादमध्ये केलं मतदान, फॅन्सनाही केलं आवाहन!

हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला आहे. 'पुष्पा' फेम अभिनेत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९६ लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. तेलंगणामध्ये, 17 मतदारसंघातील लोक मतदान करत आहेत. हैदराबादमध्येही मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि ज्युनियर एनटीआर (Jr. NTR ) यांनी हैदराबादमधील जुबली हिल्स येथील मतदान केंद्रावर मतदान केलं.

  लोकसभेच्या 96 जागांपैकी 25 आंध्र प्रदेशातील, 17 तेलंगण, उत्तर प्रदेशातील 13, महाराष्ट्रातील 11, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी आठ, बिहारमधील पाच, झारखंड आणि ओडिशातील प्रत्येकी चार आणि जम्मू आणि एक जागा आहे.  या ९६ लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या सर्व 175 जागांसाठी आणि ओडिशाच्या राज्य विधानसभेच्या 28 जागांसाठीही लोकसभा निवडणुकीसोबतच मतदान सुरू झाले आहे.

  अल्लू-अर्जुनने केलं मतदान

  सध्या पुष्पा 2 चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या अभिनेता अल्लू अर्जुनने हैदरमध्ये मतदान केलं. हैदराबादमधील ज्युबिली हिल्स परिसरातील  मतदान केंद्रावर त्याने मतदानाचा हक्का बजावला. ‘आजचा दिवस पुढील 5 वर्षांसाठी सर्वात निर्णायक दिवस’ असल्याचं तो मतदान केल्यानंतर म्हणाला.

  “Today is most crucial day for next 5 years”: Allu Arjun after getting his finger inked in Hyderabad

  Read @ANI Story | https://t.co/cF8Y8hQZn0#AlluArjun #Hyderabad #LokSabhaElection2024 pic.twitter.com/duMcj3FMJ5

  ज्युनिअर एनटीआरनेही बजावला मतदानाचा हक्क

  अभिनेता अल्लू अर्जुन प्रमाणे अभिनेता ज्युनिअर एनटीआरनेही  मतदान केलं. त्यानेही हैदराबादमधील ज्युबिली हिल्स परिसरातील  मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्का बजावला. मतदान केल्यानंतर मीडियसोबत संवाद साधताना तो म्हणाला की, “प्रत्येकाने त्यांच्या मताचा अधिकार वापरला पाहिजे”