ananya pandey

'सो पॉजिटिव' उपक्रमाची सुरुवात अभिनेत्रीने, सोशल मीडिया बुलिंगबाबत जागरूकता वाढवण्यासाठी केली होती. या युवा अभिनेत्रीद्वारे सुरू करण्यात आलेल्या या नव्या अभियानाचा उद्देश्य समाजाच्या भल्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग करणे हा आहे.

    दोन वर्षांपूर्वी अनन्या पांडेने आपल्या ‘सो पॉजिटिव’ उपक्रमाची सुरुवात केली होती, एक असा उपक्रम ज्याने साइबर-बुलिंग आणि त्याच्या गंभीर परिणामांना अधोरेखित केले आणि आज, अभिनेत्रीने ‘सोशल मीडिया फॉर सोशल गुड’चे अनावरण केले आहे. या कॅम्पेनद्वारे सोशल माध्यम सकारात्मक आणि निरोगी असण्यावर लक्ष्य केंद्रित करेल.

    अनन्या म्हणते की, “नमस्कार मित्रांनो! आशा आहे कि तुम्ही सगळे निरोगी आहात आणि आपली योग्य ती काळजी घेत आहात. मी त्या सगळ्यांचे कौतुक करते, ज्यांनी समाजाच्या भल्यासाठी रचनात्मक पद्धतीने सोशल मीडियाचा उपयोग केला आहे. सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करून तुम्ही सगळ्यांनी या वैश्विक साथीच्या रोगासोबत लढण्यासाठी, परिस्थितितून बाहेर पडण्यासाठी आणि गरजू आणि ग्रस्त लोकांच्या प्रत्येक संभाव्य मदतीसाठी स्वतःला    सशक्त बनवले आहे. लोकांनी हॉस्पिटल्समध्ये बेड, ऑक्सीजन सिलेंडर पुरवण्यासाठी मदद केली आहे. काही वॅक्सीनशी निगडित माहिती पुरवत होते तर काही भटक्या जनावरांच्या मदतीसाठी पुढे सरसावले होते, अशी ही यादी न संपणारी आहे. मी यातील काही सोशल मीडिया हिरोंसोबत ‘सो पॉजिटिव’च्या नव्या सीरीजमध्ये, #SocialMediaForSocialGood माध्यमातून संवाद साधणार आहे. सोशल मीडियातील या हीरोंच्या माध्यमातून समाजातील चांगुलपणा आणि इतरांच्या मदतीसाठी सकारात्मकपणे सोशल मीडियाचा उपयोग करण्याबाबत आणि त्याच्या व्यापक प्रभावावर चर्चा घडेल. या समाजाच्या भल्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग सुरू ठेवूयात. सोशल मीडियाला नेहमीच आशादायी, आरोग्यदायी आणि आनंदाची जागा बनवुयात.”

    ‘सो पॉजिटिव’ उपक्रमाची सुरुवात अभिनेत्रीने, सोशल मीडिया बुलिंगबाबत जागरूकता वाढवण्यासाठी केली होती. या युवा अभिनेत्रीद्वारे सुरू करण्यात आलेल्या या नव्या अभियानाचा उद्देश्य समाजाच्या भल्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग करणे हा आहे. एक उपक्रम जो विचारोत्तेजक आहे, आपल्याला हा विचार पसरवायचा  आहे की जेव्हा सोशल मीडियाचा  रचनात्मक पद्धतीने उपयोग करण्यात येतो तेव्हा तो समाजातील प्रत्येकासाठी खूप काही चांगले करू शकतो. अनन्या पांडे सोशल मीडियाच्या त्या सर्व नायकांना सलाम करते आहे ज्यांनी याचा वापर सामाजिक कल्याणासाठी केला आहे. अभिनेत्री या कॅम्पेन सीरीजच्या माध्यमातून या बाबतचा प्रचार प्रसार आणि संवाद साधणार आहे.