kranti redkar and uddhav thackeray

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक(nawab Malik) यांनी समीर वानखेडे(Sameer Wankhede) आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केले आहेत. या गंभीर आरोपांनंतर समीर वानखेडेंची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने(Kranti Redkar) पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे. तरीही आरोप थांबत नसल्याने आता क्रांती रेडकरने(Kranti Redkar Wrote A Letter To Chief Minister Uddhav Thackeray) थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे.

    क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात(Cruise Drugs Party Case) आर्यन खानला(Aaryan Khan) अटक केल्यानंतर एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे(Sameer Wankhede) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केले आहेत. या गंभीर आरोपांनंतर समीर वानखेडेंची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने(Kranti Redkar) पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे. तरीही आरोप थांबत नसल्याने आता क्रांती रेडकरने(Kranti Redkar Wrote A Letter To Chief Minister Uddhav Thackeray) थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे.

    पत्रात काय लिहिलं आहे ?

    लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करु नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करु नये हे त्या दोघांनी शिकवलं…तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे…लढते आहे… सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत…

    मी एक कलाकार आहे…राजनीती मला कळत नाही…आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लख्तर चार चौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करुन ठेवला आहे….विनोद करुन ठेवला आहे.

    आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं….एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खासगी हल्ले हे राजकारणांच किती नीच स्वरुप आहे, हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आज ते नाही पण तुम्ही आहात…त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो…

    तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आमि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे…तुम्ही कधीच माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे… म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय….तुम्ही योग्य तो न्याय करा, अशी विनंती. – आपली बहिण क्रांती रेडकर

    काय घडलं ?
    अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्ग्ज प्रकरणात अटक करण्यात आली.एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात सापडले आहेत. याप्रकरणी वानखेडे यांनी मंगळवारी दिल्लीतील ‘एनसीबी’च्या मुख्यालयात उपमहासंचालकांसमोर आपली बाजू मांडली. मात्र, वानखेडे यांच्यावर झालेल्या कथित लाचखोरीच्या आरोपाची चौकशी करण्यात येणार आहे.  दुसरीकडे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंच्या कुटुंबावर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. याप्रकरणी क्रांतीने पत्रकार परिषदे घेत आरोप आणि ट्विटरवरील पोस्टवर आक्षेप नोंदवला होता.