अभिनेत्री अंगिरा अडकली लग्नबंधनात, दिग्दर्शकाबरोबर थाटला संसार!

दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थित आनंद आणि मी आमची फ्रेंडशिप लग्नाच्या रूपात सील केल्याचं अंगिरानं म्हटलं आहे.

    अभिनेत्री अंगिरा धर दिग्दर्शक आनंद तिवारीसोबत विवाहबद्ध झाली आहे. अंगिरानं स्वत:च सोशल मीडियाद्वारे याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अंगिरानं यापूर्वी आनंदच्या ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’ या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं प्रथमच एकत्र आलेल्या दोघांचे इथेच सूर जुळले आणि आता दोघेही विवाह बंधनात अडकले आहेत. खरं तर दोघांनी ३० एप्रिललाच लग्न केलं आहे. याची घोषणा मात्र नुकतीच करण्यात आली आहे.

    दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थित आनंद आणि मी आमची फ्रेंडशिप लग्नाच्या रूपात सील केल्याचं अंगिरानं म्हटलं आहे. हळूहळू आमचं लाईफ अनलॅाक होत असून, आम्हाला तुमच्यासोबत हा आनंद शेअर करायचा असल्यानं फोटो शेअर केल्याचं तिनं लिहीलं आहे.

    अंगिरानं ‘बँग बाजा बारात’ या वेब सिरीजसोबतच ‘कमांडो ३’ हा चित्रपट केला असून, आगामी ‘मेडे’मध्येही ती दिसणार आहे. आनंदनं ‘काईट्स’, ‘उडान’ आणि ‘गो गावा गॅान’ या चित्रपटांसोबच नेटफ्लिक्ससाठी ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’ हा चित्रपट बनवला आहे. यात अंगिरासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे.