anushka

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय कर्णधार विराट कोहली लवकरच आई बाबा होणार आहेत. जानेवारी महिन्यात ते आपल्या बाळाला जन्म देतील. यासाठी दोघांनीही खूप तयारी केली आहे. इतकंच नाही तर बाळाचं संगोपन कशा पद्धतीने करायचं याबाबतही त्यांनी विचार केला आहे.

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्काने वोग (Vogue) मॅगजिनला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की,  मी आणि विराट आमच्या बाळाला मीडियापासून दूर ठेवू इच्छित आहोत. त्याचप्रमाणे बाळ जास्त मस्तीखोर होणार नाही, याची पण काळजी घेणार आहोत. बाळाचं संगोपन कसं करणार, त्याबाबतही तिने या मुलाखतीत सांगितलं.

यावेळी अनुष्का म्हणाली, मी प्रगतीशील कुटुंबातून आली आहे. जिथे लहान मुलांचे सर्व लाड पुरवले जातात त्यासोबतच त्यांना इतरांचा आदर करायलाही शिकवलं जातं. आम्हाला आमच्या मुलाला मस्तीखोर बनवायचं नाहीये. मी आई होण्यापूर्वीपासूनच याचा विचार करत होते.

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्काने सांगितलं की विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही.