बॉलिवूड आणखी एका अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न, फोटो व्हायरल!

'लव्ह आज कल' मधील निरागसपणा, सौंदर्य आणि शानदार अभिनयाने अनेकांची मने जिंकणाऱ्या या अभिनेत्रीने लग्न केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांनी ही माहिती दिली आहे.

    गेल्या काही दिवसात बॅालिवूडमधील अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली. काही कलाकारांनी थाटामाटात भव्य पद्धतीने लग्न केलं तर काहींनी कुटुंब  आणि काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याला पंसती दिली. नुकतचं अभिनेत्री तापसी पन्नुनेही असचं गुपचूपपणे बॅायफ्रेंडसोबत लग्न उरकलं तसचं अभिनेत्री अदिती राव हैदरीनेही अभिनेता सिद्धार्थसोबत असंच गुपचूप लग्न केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव समाविष्ट झालं आहे. ‘लव्ह आज कल’ मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री आरुषी शर्माने (Arushi Sharma) कास्टिंग डायरेक्टर वैभव विशांतसोबत (Vaibhav Vishant) गूपचूप लग्न उरकलं आहे.  आरुषी शर्मा आणि वैभव विशांतच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

    आरुषी शर्मा आणि वैभव विशांत यांनी गुपचूप केलं लग्न

    अभिनेत्री आरुषी शर्मा आणि दिग्दर्शक वैभव विशांत यांचे लग्न झाले आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये दोघे खूपच सुंदर दिसत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री आरुषी शर्मा पेस्टल गुलाबी लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे, तर वैभवही शेरवानीत देखणा दिसत आहे. वृत्तानुसार, या गुप्त लग्नात कपलचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

    अभिनेत्री आरुषी शर्माबद्दल

    अभिनेत्री आरुषी शर्माने इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’ या चित्रपटात छोट्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. मात्र, आरुषी शर्माला 2020 मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. यानंतर अभिनेत्रीने ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या ड्रामा फिल्म ‘जादुगर’ आणि ‘काला पानी’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली.