धनश्रीच्या चिमुकल्याचं झालं बारसं, बाळाचा फोटो शेअर करत सांगितलं नाव!

धनश्रीने आई होणार असल्याची माहितीदेखील एक सुंदर व्हिडीओ शेअर करत दिली होती. धनश्रीने खऱ्या अर्थाने तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय केल्याचं म्हटलं जातं. प्रेग्नंसीच्या काळात धनश्रीने बरेच फोटोशूट केलं आहेत.

    छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री धनश्री काडगावकरने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला. धनश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मुलगा झाल्याची गोड बातमी दिली होती. मुलाच्या जन्मानंतर धनश्रीने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण त्यात बाळाचा चेहरा मात्र दिसत नव्हता. आता मुलाच्या बारशाच्या निमित्ताने धनश्री आणि दुर्वेशने त्यांच्या मुलाचा चेहरा दाखवला आहे.

    नुकतच धनश्रीच्या बाळाचं बारसं झालं. या बारश्याचे फोटो धनश्रीने सोशल मीडियावर शेअऱ केले आहे. यात तिच्या गोड बाळाचा फोटोही दिसत आहे. धनश्रीने बाळाचं नाव ‘कबीर’ असं ठेवलं आहे.धनश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

    धनश्रीने आई होणार असल्याची माहितीदेखील एक सुंदर व्हिडीओ शेअर करत दिली होती. धनश्रीने खऱ्या अर्थाने तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय केल्याचं म्हटलं जातं. प्रेग्नंसीच्या काळात धनश्रीने बरेच फोटोशूट केलं आहेत. त्यामुळे ती या काळात सातत्याने चर्चेत होती.