‘ये है मोहब्बतें’ फेम अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘ये है मोहब्बतें’ मधून घराघरात पोहचलेली अभिनत्री दिव्यांका त्रिपाठीचा (Divyanka Tripathi Accident) अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर दिव्यांकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिव्यांकाचा पती आणि अभिनेता विवेक दहियाने (Vivek Dahiya) तिच्यासोबत रुग्णलयात उपस्थित आहे. या अपघातात सध्या दिव्यांकाची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत. दिव्यांकावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचीही माहिती आहे.

  दिव्यांकाचा झाला अपघात

  मिळालेल्या माहितीनुसार, 18 एप्रिल 2024 रोजी दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाला. याबाबत पती विवेक दहियाच्या चाहत्यांना याबद्दल माहिती दिली. विवेकच्या पीआर टीमने जास्त माहिती दिली नसली तरी रिपोर्ट नुसार, दिव्यांकाच्या हातातील दोन हाडे मोडली  आणि ती आता डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. तिने एक एक्स-रे फोटो देखील शेअर केला आहे. सध्या विवेक तिच्यासोबत रुग्णालयात आहे. आपल्या सदिच्छांसाठी, सहकार्यासाठी आभार मानत असल्याचे दिव्यांका-विवेकच्या टीमकडून सांगण्यात आले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Vivek Dahiya (@vivekdahiya)

  चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

  दिव्यांकाच्या अपघाताचं वृत्त कळताच चाहत्यांसोबत सेलेब्रिटिंनी चिंता व्यक्त करत तिला लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दिव्यांकाने ‘बनू में तेरी दुल्हन’ मालिकेत ‘विद्या’च्या भूमिकेने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र, ‘ये है मोहब्बतें’ या शोमधील ‘डॉक्टर इशिता भल्ला’च्या भूमिकेने तिला प्रचंड प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. याशिवाय याच शोच्या सेटवर दिव्यांकाची भेट अभिनेता विवेक दहियाशी झाली आणि हळूहळू दोघेही प्रेमात पडले. नंतर 8 जुलै 2016 रोजी दोघांनी लग्न केले.