kareena kapoor and amrita arora

अभिनेत्री करिना कपूर आणि तिची मैत्रीण अमृता अरोरा ( Kareena Kapoor And Amrita Arora Corona Positive)) या दोघींना कोरोनाची लागण झाली आहे.करिना व अमृताने गेल्या काही दिवसांत अनेक पार्ट्यांना हजेरी लावली. या पार्ट्यांमुळे बेबो व अमृता कोरोनाच्या सुपरस्प्रेडर(Super Spreader) ठरण्याची शक्यता आहे.

    अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) आणि तिची मैत्रीण अमृता अरोरा (Amrita Arora) या दोघींना कोरोनाची लागण झाली आहे. दोघीही सध्या होम क्वारंटाईन आहेत. (Kareena Kapoor And Amruta Arora Found Corona Positive) एएनआयने याबाबतची माहिती दिली आहे. बृहन्मुंबई पालिकेच्या(BMC) सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. पालिकेने करिना व अमृताच्या संपर्कात येणाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत.


    करिना व अमृताने गेल्या काही दिवसांत अनेक पार्ट्यांना हजेरी लावली. या पार्ट्यांमुळे बेबो व अमृता कोरोनाच्या सुपरस्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेने यासंदर्भात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यास सुरुवात केली आहे. करिना व अमृता दोघींना कोरोनाची लक्षणं जाणवत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली, जी पॉझिटिव्ह आली आहे. करीना कपूर आणि अमृता अरोरा गेल्या काही दिवसांपासून विविध पार्ट्यांमध्ये दिसल्या होत्या.काही दिवसांपूर्वी करिना तिच्या गर्ल गँगसोबत पार्टी करताना दिसली होती. या पार्टीत करिनासोबत तिची बहिण करिश्मा कपूर आणि मलायका अरोरा सहभागी होत्या. अनिल कपूरची लेक रिया कपूरच्या घरी ही पार्टी झाली होती. या पार्टीत करिना आपल्या गर्ल गँगसोबत धम्माल करताना दिसली होती.

    अगदी दोन दिवसांपूर्वी करिना, करिश्मा करण जोहरच्या पार्टीत हजर झाल्या होत्या. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही पार्टी आयोजित केली गेली होती. याच पार्ट्या करिना व अमृताला भोवल्या आहेत. करिना व अमृताच्या संपर्कात आलेल्या अनेकांची कोरोना चाचणी केली जात आहे.

    देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा विचार केल्यास, सध्या राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. सध्या मुंबईत १४४ कलम म्हणजेच जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत राज्यात १७ जणांना ओमायक्रॉनची लागण झाली असून, त्यातील सात जण बरेही झाले आहेत.