अभिनेत्री लारा दत्ताला कोरोनाची लागण, मुंबई पालिकेकडून घर सील करत कंटेन्मेंट झोनची घोषणा

अभिनेत्री लारा दत्ताला (Lara Dutta) कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई महानगरपालिकेनं (BMC) तिचं घर सील केलं आहे. सुदैवाने लारा दत्ताच्या कुटुंबातील इतर कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नाही.

    राज्यात रोज नोंद होणारी कोरोना रुग्णांची संख्या वेगाने घटत आहे. तर मुंबईतील रुग्णसंख्याही गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. मात्र अभिनेत्री लारा दत्ताला (Lara Dutta) कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई महानगरपालिकेनं (BMC) तिचं घर सील केलं असून तिच्या घराचा परिसर हा ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

    सुदैवाने लारा दत्ताच्या कुटुंबातील इतर कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नाही. गुरुवारी मुंबईत ५४ नवे रुग्ण आढळले आणि आज (शुक्रवारी) लाराचं घर महापालिकेकडून सील करण्यात आले. नव्याने आढळलेल्या ५४ रुग्णांपैकी चार रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याचं पहायला मिळतंय. सध्या रुग्णालयात केवळ २७ रुग्ण दाखल आहेत.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Lara Dutta Bhupathi (@larabhupathi)

    दैनंदिन रुग्णसंख्या आता वेगाने घटत असल्यामुळे रुग्णांची संख्या ही हजाराच्या खाली गेली आहे. सध्या राज्यात ९५६ रुग्ण उपचाराधीन आहेत. एप्रिल २०२० नंतर पहिल्यांदाच ही संख्या इतकी खाली गेली आहे. कोविडची पहिली आणि दुसरी लाट ओसरली तरी राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली कधीच गेली नव्हती.