monalisa bagal in ka re deva

अभिनेत्री मोनालिसा बागल(Monalisa Bagal) आता ‘का रं देवा’ (Ka Re Deva)या चित्रपटात झळकणार आहे. प्रेमकथा(Love Story) असलेल्या या चित्रपटाचं टिझर पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.

    आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणारी मोनालिसा बागल(Monalisa Bagal) ‘का रं देवा’ (Ka Re Deva)या चित्रपटातही झळकणार आहे. प्रेमकथा(Love Story) असलेल्या या चित्रपटाचं टिझर पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. पोस्टरमुळं चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. एकमेकांच्या अतिशय जवळ उभे असलेले दोघं आणि एक आदर्शमय प्रेमकथा ही टॅगलाईन पोस्टरवर पाहायला मिळते. तसंच वेगवेगळ्या रंगांच्या वापरामुळं प्रेमाच्या नात्यातले विविध रंगही पोस्टरवर उतरले आहेत. त्यामुळं या प्रेमकथेत काय पाहायला मिळणार याचं कुतुहल निर्माण झालं आहे. ११ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित(Ka Re Deva Release Date) होणार आहे.

    यापूर्वी मोनालिसानं ‘झाला बोभाटा’ या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. यासोबतच ‘करंट’, ‘रावरंभा’ आणि ‘भिरकीट’ या आगामी चित्रपटातही मोनालिसा महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहे. ‘का रं देवा’मध्ये मोनालिसाचा नायक कोण? हे अजून गुलदस्त्यात असून, अरुण नलावडे, नागेश भोसले आणि जयवंत वाडकर आदी दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत.

    सह्याद्री फिल्म प्रोडक्शनच्या प्रशांत शिंगटे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत दशरथ जाधव यांचं आहे. सुशांत माने, तानसेन लोकरे यांची गीतं संदीप भुरे यांनी संगीतबद्ध केली आहेत. गायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे, मधुर शिंदे, डॉ. नेहा राजपाल, सुप्रिया सोरटे यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.