कुठल्याही भूमिकेत टाइपकास्ट होणार नाही अभिनेत्री नारायणी शास्त्रीने व्यक्त केलं मत!

नारायणी शास्त्री आपल्या कामाला केवळ एक भूमिका, एक व्यक्तिरेखा म्हणूनच महत्त्व देते. यामुळे तिच्यासमोर तिच्याहून मोठ्या वयाचा अभिनेता तिचा मुलगा म्हणून दाखवण्यात येत असला तरी तिला काही फरक पडत नाही.

  रुपेरी पडद्यावर आईची भूमिका साकारायची म्हटली तर कोणताही कलाकार जरा नाखुशच असतो. कारण पुढे हा कलाकार त्याच भूमिकेसाठी टाइपकास्ट होऊ शकतो ही त्यांना भीती असते. असे असले तरी अभिनेत्री नारायणी शास्त्री मात्र टाइपकास्ट व्हायच्या या संकल्पनेशी मुळीच सहमत नाही. म्हणूनच तर ती स्टार प्लसवरील ‘आपकी नजरों ने समझा’ या लोकप्रिय मालिकेत नायक अभिनेता विजयेंद्र कुमेरिया याच्या आईची भूमिका साकारतेय. प्रेक्षकांनाही तिची ही भूमिका खूपच आवडतेय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Narayani Shastri (@narayanishastri)

   

  आपल्या वयाहून जास्त वयाच्या अभिनेत्याच्या आईची भूमिका साकारण्याबाबत आपले मत व्यक्त करताना अभिनेत्री नारायणी शात्री म्हणते, ‘एक अभिनेत्री म्हणून माझ्यासमोर असलेल्या अभिनेत्यांच्या वयाचा विचार मी कधीच केला नाही. मी ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारतेय हेच केवळ मी लक्षात घेते. येथे तर मी समोर असलेल्या अभिनेत्याची आई आहे बस्स… या मालिकेतही मी एका अशा आईची भूमिका साकारतेय, जिचा विजयेंद्रच्या वयाचा मुलगा आहे. मला ही भूमिका करायला काहीच समस्या नाही. याशिवाय ही मालिका इतर मालिकांसारखी नाही, जेथे एक टिपिकल व्हॅम्प-अ‍ॅक्टर फॉर्म्युला दाखवला जातो. या मालिकेत प्रेक्षकांना एक वेगळ्या प्रकारचे कथानक पाहायला मिळतेय. या मालिकेत माझी ही भूमिका केवळ एका आईची नाहीये, तर एक मजबूत आणि बुद्धिमान बिझनेस वुमनची ही भूमिका आहे.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Narayani Shastri (@narayanishastri)

   

  आपला ऑनस्क्रीन मुलगा विजयेंद्र याच्यासोबतच्या केमिस्ट्रीबाबत बोलताना ती म्हणते, ‘आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आमची चांगली गट्टी जमली आहे. कारण आमच्यात कुठल्याही प्रकारची असुरक्षितची भावना, अहंकार किंवा भांडणाचे भावही नाहीत. मला वाटतं यामुळेच आम्ही स्क्रीनवर आपापल्या भूमिका योग्य प्रकारे साकारू शकत आहोत. मुळातच ही कहाणी आई व मुलाच्या जोडीभोवती फिरतेय.’

  यामुळे आता स्पष्ट झालेच आहे की, नारायणी शास्त्री आपल्या कामाला केवळ एक भूमिका, एक व्यक्तिरेखा म्हणूनच महत्त्व देते. यामुळे तिच्यासमोर तिच्याहून मोठ्या वयाचा अभिनेता तिचा मुलगा म्हणून दाखवण्यात येत असला तरी तिला काही फरक पडत नाही. यावरून नारायणी शास्त्री हिची कामाप्रति असलेली निष्ठाच स्पष्ट होते.

  नारायणी शास्त्री हिची ही राजस्वी व्यक्तिरेखा पाहण्यासाठी पाहात राहा ‘आपकी नजरों ने समझा’ सोमवार ते शनिवार, सायंकाळी ६ वाजता केवळ स्टार प्लस वाहिनीवर.