जवानच्या यशासाठी शाहरुख खान तिरुपती चरणी लीन! कुटुंबिय आणि अभिनेत्री नयनताराससह घेतलं व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात घेतलं दर्शन

शाहरुख खानचा 'जवान' या चित्रपट शक्रवारी रिलीज होणार आहे आणि त्यासाठी त्याने नुकताच व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट देत चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली.

    शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) कुटुंबासाठी हे वर्ष खूप खास आहे, कारण शाहरुख खानचा या वर्षातील दुसरा मोठा चित्रपट जवान  (Jawan) मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. तर, त्याची मुलगी सुहाना खानही या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जवानच्या रिलीजपूर्वी शाहरुखने त्याची मुलगी आणि जवान सहकलाकार नयनतारासोबत (Nayantara) तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिते चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. या  तिघांचाही एक  व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते पारंपारिक लूकमध्ये दिसत आहेत.

    व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर उपस्थित चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या. शाहरुखसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानीही उपस्थित होती. यापुर्वीही ते वैष्णोदेवी मंदिरात गेले होते आणि तेथेही त्यांनी भगवानांचे दर्शन घेतले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावला होता.

    7 सप्टेंबर रिलीज होणार जवान चित्रपट

    जवान चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर शाहरुखसोबत नयनतारा आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत. अॅटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय दीपिका पदुकोण, संजय दत्त आणि थलपथी विजय या चित्रपटात खास कॅमिओ आहेत. दुसरीकडे, वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सान्या मल्होत्रा, प्रियामणी आणि रिद्धी डोगरा सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत रिलीज होणार आहे. चित्रपटाबाबत चांगलीच उत्सुकता आहे. शाहरुखचे 85 हजार चाहते किंग खानचा चित्रपट एकत्र पाहून आनंद साजरा करणार आहेत.

    सुहानाचही बॉलिवूडमध्ये पदार्पण

    वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगी सुहानाही आता बॅालिवूडमध्ये येण्यास सज्ज आहे.  लवकरच सुहाना द आर्चीज या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. झोया अख्तर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाद्वारे केवळ सुहानाच नाही तर जान्हवीची बहीण खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहेत.