‘स्‍वावलंबी बना आणि नेहमी स्‍वत:चे ऐका!’, अभिनेत्री नेहा पेंडसेने दिला Women’s day च्या दिवशी दिला महिलांना सल्ला!

आंतरराष्‍ट्रीय महिला दिनानिमित्त एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'भाबीजी घर पर है'मध्‍ये अनिता भाभीची भूमिका साकारणारी नेहा पेंडसे महिला घेत असलेली मेहनत, ती प्रशंसा करणा-या काही महिला आणि प्रबळ महिलेच्या भूमिका साकारण्‍याबाबत सांगत आहे. तिच्‍यासोबत केलेल्‍या गप्‍पागोष्‍टीदरम्‍यान तिने प्रांजळपणे सांगितलेल्‍या गोष्‍टी:

  १. ‘महिला नेतृत्‍वस्‍थानी: कोविड-१९ काळामध्‍ये समान भविष्‍य संपादित करत आहे’ यावर आधारित आंतरराष्‍ट्रीय महिला दिनाची थीम तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे?

  जगभरात महामारी पसरली तेव्‍हा जगभरातील सर्व महिलांनी स्थिती स्‍वत:च्‍या हातामध्‍ये घेतली. व्‍यावसायिक जीवनापासून घरामध्‍ये संतुलन राखण्‍यापर्यंतच्‍या प्रत्‍येक गोष्‍टीमध्‍ये यश मिळवले. असे कोणतेच काम नाही, जे त्‍यांनी केले नाही आणि ते काम अधिक उत्तमरित्‍या केले. माझ्या मते, लैंगिक असमानतेचा परिणाम कमी झाला आहे. विशेषत: मेट्रो शहरांमधील महिला एकमेकींना पाठिंबा देण्‍यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. काळ व स्थितीसह जगाला समजले आहे की, महिला कमकुवत नसून पुरूषांइतक्‍याच समान आहेत.

  २. तुझ्यासाठी सर्वात प्रेरणादायी महिला (नेतृत्‍व पदावरील व मनोरंजन क्षेत्रातील) कोण व का?

  मी अनेक महिलांना पाहते आणि त्‍या स्‍वत:ला कशाप्रकारे पुढे घेऊन जातात व स्‍वावलंबीपणे जीवन जगतात यासाठी त्‍यांचे कौतुक करते. हिना खान ही या टेलिव्हिजन क्षेत्रातील अशीच एक महिला आहे. ती अत्‍यंत धाडसी महिला आहे, जी तिच्‍या अधिकारांसाठी लढते आणि मला तिचे हे गुण खूप आवडतात. आणखी एक महिला आहे दिव्‍यांका त्रिपाठी, जी मला प्रेरित करते. त्‍या कुशल आहेत आणि त्‍यांच्‍यासाठी महत्त्वाच्‍या व मनाच्‍या खूप जवळ असलेल्‍या समस्‍यांविरोधात आवाज उठवतात. मी प्रशंसा करणारी आणखी एक महिला आहे एकता कपूर. तिचे व्‍यक्तिमत्त्व अत्‍यंत प्रबळ असून ती धाडसी व महत्त्वाकांक्षी आहे. तिने या क्षेत्रामध्‍ये तिचे नावलौकिक केले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

   

  ३. मागील एक वर्षापासून आपण देशवासी महामारीचा सामना करत आलो आहोत. जगामध्‍ये लॉकडाऊन व आर्थिक मंदी असण्याच्‍या काळादरम्‍यान तू तुझे कामाचे योग्‍यरित्‍या व्यवस्थापन कशाप्रकारे केलेस?

  प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, माझा विवाह २०२० मध्‍ये झाला, ज्‍यामुळे मी त्‍वरित काम करण्‍यास उत्‍सुक नव्‍हते. मला माझ्या जोडीदारासोबत वेळ व्‍यतित करण्‍यासाठी काहीसा मोकळा वेळ पाहिजे होता. सुदैवाने आर्थिक मंदीचा माझ्यावर कोणताच परिणाम झाला नाही. विवाह करण्‍याचा निर्णय मी स्‍वत:हून घेतला होता. पण मला माझ्या अवतीभोवती असलेल्‍या लोकांना सामना कराव्‍या लागलेल्‍या आव्‍हानात्‍मक स्थितींबाबत माहित आहे. मी काम करत नसताना देखील घरी राहून कंटाळले होते, पण घरी राहणे आवश्‍यक होते. माझ्यासाठी २०२० मधील मोठी शिकवण म्‍हणजे आव्‍हानात्‍मक काळामध्‍ये देखील आशावादी राहणे आणि काम करण्‍यासोबत एकमेकांचा आधार बनणे.

  ४. तुझ्या मते, विशेषत: श्रमजीवी महिलांना काम-जीवन संतुलन राखण्‍याची गरज असल्‍यामुळे तुझ्या वयाच्‍या महिलांना आज सामना करावी लागणारी सर्वात मोठी समस्‍या कोणती?

  माझ्या मते, याबाबत वय महत्त्वाचे नसून जीवनाकडे पाहण्‍याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. महिलेला तिचे अधिकार माहित असले पाहिजेत आणि त्‍या अधिकारांना कृतीत आणण्‍याची शक्‍ती व धैर्य असले पाहिजे. नेहमी स्‍वत:वर विश्‍वास ठेवा, दुस-यांना निर्णय घेऊ देऊ नका आणि मनापासून बोला. तुमचा आवाज उठवा. आपण राहत असलेल्‍या समाजामध्‍ये आपल्‍यावर अधिकार गाजवणा-या व्‍यक्‍ती म्‍हणजे पालक, जोडीदार किंवा भाऊ. आपण आपला विश्‍वास असलेल्‍या गोष्‍टीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आणि आपल्‍या विचारांना व्‍यक्‍त केले पाहिजे. मी माझ्या जीवनामध्‍ये काहीसा उशिरा विवाह केला, कारण माझ्यामध्‍ये मला सूट न होणा-या गोष्‍टींना नाही म्‍हणण्‍याचे धैर्य होते. लोकांनी मला गृहीत धरण्‍याचा प्रयत्‍न केला, पण मी त्‍यांच्‍याकडे दुर्लक्ष करत फक्‍त स्‍वत:कडे लक्ष दिले. मी अविवाहित असल्‍याचे म्‍हणणे अवघड होते, पण मी हताश होऊन न जाण्‍याचे आणि दुस-यांनी ठरवलेल्‍या नात्‍यामध्‍ये गुंतून न जाण्‍याचे ठरवले. शेवटी, हे माझे जीवन आहे आणि मी ते माझ्यापरीने जगेन. मी दुसरे माझ्यासाठी काय शोभेल याबाबत करत असलेल्‍या विचारांकडे दुर्लक्ष करते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

   

  ५. तुझ्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुझ्या मते या भूमिकेची खासियत काय आहे?

  अनिता भाभी ही समकालीन व आजच्‍या काळातील महिला आहे. ती एक प्रेरणास्रोत आहे, कारण ती स्‍वत:चा विचार करते आणि स्‍वत:च्‍या जीवनाकडे लक्ष देते. अनिता भाभी धाडसी आहे आणि विश्‍वास असलेल्‍या गोष्‍टीच्‍या मागे खंबीरपणे उभी राहते. ती सहजपणे हताश होत नाही. प्रेक्षक तिच्‍या या गुणांची प्रशंसा करतात. प्रेक्षक, विशेषत: महिला प्रेक्षक तिच्‍याकडे आदर्श म्‍हणून पाहतात. ती हुशार महिला आहे आणि मला तिचे हे गुण खूप आवडतात. हेच अनिता व माझ्यामध्‍ये साम्‍य आहे. प्रेक्षक अशा प्रबळ महिलांकडे त्‍वरित आकर्षित होण्‍यासोबत त्‍यांची प्रशंसा व कौतुक देखील करतात.

  ६. तुझ्या मते, महिलेमध्‍ये कोणत्‍या क्षमता आहेत?

  महिलेमध्‍ये विश्‍वात वादळ निर्माण करण्‍याची क्षमता आहे. संपूर्ण विश्‍वाला तिची क्षमता, शक्‍ती व नीडरपणाबाबत माहित आहे. महिलांना हरवणे सोपे नाही. माझ्या मते, महिलांमध्‍ये सामजिक बदल घडवून आणण्‍याची अंतरिक क्षमता आहे. त्‍यांच्या व्‍यक्तिमत्त्वामध्‍ये आणि ते करत असलेल्‍या प्रत्‍येक कार्यामध्‍ये संयम, चिकाटी, सर्वोत्तमता आहे. खडतर कामे सावधपणे करण्‍यासाठी परिश्रम व क्षमता असण्‍यामध्‍ये खरी शक्‍ती सामावलेली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

   

  ७. एक संदेश, जो तुला सर्व तरूणींना व महिलांना द्यायला आवडेल?

  मला फक्‍त एवढेच सांगायचे आहे की, आवाज उठवणे आणि स्‍वत:चे विचार व्‍यक्‍त करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. हा स्‍वार्थीपणा नाही, तर आपला विश्‍वास असलेल्‍या गोष्‍टीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आणि ते कार्य पूर्ण केले पाहिजे. नेहमी डोळे व कान उघडे ठेवा, जागरूक राहा आणि तुम्‍ही कोण आहात व जीवनामध्‍ये काय पाहिजे हे व्‍यक्‍त करा. स्‍वावलंबी बना आणि नेहमी स्‍वत:चे ऐका!