‘सुपर डान्सर’ च्या बच्चेकंपनीचे डान्सबघून नितू सिंग झाल्या अवाक, यावेळी रणबीरची सांगितली खास आठवण!

परीच्या त्या भावनाप्रधान परफॉर्मन्सने नितू कपूर अवाक झाली. इतके भावनाप्रधान गाणे या दोघांनी आपल्या परफॉर्मन्सने किती गोड केले हे पाहून तिला आश्चर्य वाटले.

  या वीकएंडला सुपर डान्सर सत्र ४ मध्ये बच्चेकंपनी नितू कपूरच्या गाजलेल्या गाण्यांवर परफॉर्म करणार आहेत. हे डान्स बघताना नितूजी काहीशा भावूक झाल्या आहेत. आपली जूनी गाजलेली गाणी त्यांनीही खूप एन्जॉय केली आहेत.  स्पर्धक परी आणि तिचा सुपर गुरु पंकज थापा यांनी ‘छू कर मेरे मन को’ या नितू कपूरच्या गाजलेल्या गाण्यावर परफॉर्म केले आणि आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांनाच थक्क करून सोडले. 

   

  परीच्या त्या भावनाप्रधान परफॉर्मन्सने नितू कपूर अवाक झाली. इतके भावनाप्रधान गाणे या दोघांनी आपल्या परफॉर्मन्सने किती गोड केले हे पाहून तिला आश्चर्य वाटले. 

   

  इतक्या कोवळ्या वयात परीचे अप्रतिम नृत्य कौशल्य पाहून नितू कपूरने एक आठवण सांगितली जेव्हा ती स्वतः पाच वर्षांची होती आणि सूरज चित्रपटासाठी तिने पहिला शॉट दिला होता. तो डोंगरावर पळत जाण्याचा शॉट तिला पुन्हा पुन्हा आख्खा दिवस द्यावा लागला होता आणि तिचे पाय सोलवटून गेले होते. यावेळी रणबीरची चाहती असलेल्या परीने नितू कपूरला विचारले की, रणबीर अजूनही खट्याळ आहे का. यावर नितू कपूर उत्तरली, “रणबीर लहानपणी खूप खट्याळ होता आणि त्याला सगळ्या गोष्टींबद्दल उत्सुकता असायची. 

   

  तो सतत काही ना काही खोड्या करत असायचा.” ती पुढे म्हणाली, “पण मला आनंद वाटतो की, आता तो खूप समंजस झाला आहे.”  अनुराग बसूने रणबीरचा एक किस्सा सांगितला. बर्फीच्या सेट्सवर एकदा रणबीर कपूरला दुखापत झाली होती, तेव्हा त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्या आसपास सगळेजण असूनही त्याने मात्र लगेच आपल्या आईला फोन लावला होता. त्यामुळे आठवणी आणि डान्सने भरलेला हा विकेंड नितुजींच्या आणि सुपर डान्सरच्या फॅन्ससाठी खास ठरणार आहे.