प्रतिक्षा मुणगेकर “जीव माझा गुंतला” मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत!

मल्हार - अंतरा यांना नियती एका सूत्रात बांधते आणि मग कसोटी लागते नात्याची. हे दोघे नियतीवर मात करून पुढचा प्रवास कसा करतील हे बघणे उत्कंठावर्धक असणार आहे.

    कलर्स मराठीवर जीव माझा गुंतला मालिकेचे प्रोमो सुरू झाल्यापासून मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये बरीच उत्सुकता आहे. मालिकेचे कथानक काय असेल, कोण कोण कलाकार मालिकेत असतील ? मालिका येत्या सोमवार पासून म्हणजेच २१ जूनपासून सोम ते शनि रात्री ९.३०वा. आपल्या कलर्स मराठीवर सुरू होत आहे. घाडगे & सून या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये अबाधित स्थान मिळवले. Maaliketil पात्र प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहेत. यामध्ये अजून एका नावाची कमतरता आहे आणि ते म्हणजे कियारा. कियाराची भूमिका साकारणारी प्रतिक्षा मुणगेकर तीन वर्षानंतर पुन्हाएकदा कलर्स मराठीवरील “जीव माझा गुंतला” या नव्या मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

    प्रतिक्षा मालिकेत चित्रा खानविलकरच्या भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “खरं सांगायचं तर मला घरी परतल्यासारखं वाटतं आहे. तब्बल तीन वर्षानंतर मी पुन्हा कलर्स मराठीवर मालिका करते आहे आणि टेल-अ-टेल मिडीयाचं प्रॉडक्शन हाऊस आहे, हा एक योगायोगा म्हणावा लागेल. वाहिनी आणि प्रॉडक्शन हाऊसने इतका विश्वास दाखवला आहे त्यामुळे माझी जबाबदारी खूप वाढली आहे असं मला वाटतं. खूप मजा येते आहे सेटवर, तीच लोकं आहेत आजूबाजूला, खुप सकारात्मक वातावरण आहे. त्याच जोमाने काम करणार आहे. ज्याप्राकरे कियारावर प्रेम केलं तसेच चित्रावर देखील करा हीच ईच्छा आहे.
     
    दोन विरुद्ध विचारांच्या, भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांसमोर आल्या तर ? अंतरा आणि मल्हारच्या बाबतीत असच काहीसं घडणार आहे. दोघेही एकमेकांचा तिरस्कार करतात, पण नियती आपला डाव खेळतेच. मल्हार – अंतरा यांना नियती एका सूत्रात बांधते आणि मग कसोटी लागते नात्याची. हे दोघे नियतीवर मात करून पुढचा प्रवास कसा करतील हे बघणे उत्कंठावर्धक असणार आहे. तेव्हा नक्की बघा ‘जीव माझा गुंतला’ २१ जूनपासून सोम ते शनि रात्री ९.३०वा. आपल्या कलर्स मराठीवर