purva shinde

तुझं माझं जमतंय हि मालिका नुकतीच झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि सुरुवाती पासूनच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. अपूर्वा नेमळेकरने या मालिकेतून टीव्ही माध्यमात पुनरागमन केलं त्यामुळे तिला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहायला मिळतंय याचा आनंद प्रेक्षकांना आहे. अपूर्वा सोबतच रोशन विचारे आणि मोनिका बागुल या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.

तुझं माझं जमतंय हि मालिका नुकतीच झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि सुरुवाती पासूनच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. अपूर्वा नेमळेकरने या मालिकेतून टीव्ही माध्यमात पुनरागमन केलं त्यामुळे तिला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहायला मिळतंय याचा आनंद प्रेक्षकांना आहे. अपूर्वा सोबतच रोशन विचारे आणि मोनिका बागुल या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या मालिकेचं शूटिंग नगरमध्ये चालू आहे. आता या मालिकेत अजून एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची लाडकी जयडी म्हणजेच अभिनेत्री पूर्वा शिंदे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मालिकेतील अश्विनी हिच्या ‘गेली सासरला, पाय तिचा घसरला’ या आवडत्या मालिकेतील राजनंदिनीची भूमिका पूर्वा साकारतेय. राजनंदिनी म्हणजे अत्यंत सोज्वळ, गोड, सगळ्यांना सांभाळून घेणारी, आदर्श सून, आदर्श मुलगी, आदर्श बायको आणि सतत चेहऱ्यावर हास्य असणारी अशी आहे.

पूर्वाच्या या नवीन भूमिकेबद्दल बोलताना ती म्हणाली, “तुझं माझं जमतंय या मालिकेत राजनंदिनी, अश्विनी आणि शुभंकर यांच्या आयुष्यात एक नवीन वळण घेऊन येणार आहे. जयडी सारख्या निगेटिव्ह भूमिकेनंतर आता राजनंदिनी सारखी सकारत्मक आणि गोड मुलगी म्हणून मी प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. नागरमधल्या कडाक्याच्या थंडीत आम्ही शूटिंग करतोय आणि खूप मजा येतेय. प्रेक्षकांना देखील मालिकेत राजनंदिनीला बघून तितकीच मजा येईल अशी मी आशा करते.”