अभिनेत्रीचा १४ लोकांवर लैंगिक शोषणाचा आरोप, निर्माता-दिग्दर्शकांसह पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचाही समावेश!

रेवतीनं जेव्हा ही पोस्ट शेअर केली त्यावेळी तिनं आपल्याला कोणाचीही भीती वाटत नसल्याचे सांगितले आहे. ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे त्यांची नावे बिनधास्तपणे शेअर करणार असल्याचे सांगितले आहे.

    मल्याळम चित्रपट विश्वातील प्रसिध्द अभिनेत्री रेवती संपतने एक धक्कादायक खुलासा केला आहे. रेवतीनं आपल्यावर १४ जणांनी शाररिक अत्याचार केल्याचं सांगितले आहे. त्यात एका सिद्धिकी नावाच्या अभिनेत्याचाही समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.

    रेवतीनं आपल्यावर झालेल्या आरोपांची माहिती फेसबूक पोस्ट  शेअर करत दिली आहे. त्या पोस्टला तिच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. रेवतीला त्यांनी आधार देत तिला आपला पाठींबाही जाहिर केला आहे. आपल्या त्या पोस्टमध्ये तिनं १४ जणांची नावंही सांगितली आहेत. त्यात एक नाव प्रख्यात अभिनेता सिद्धिकीचेही आहे. रेवतीनं जेव्हा ही पोस्ट शेअर केली त्यावेळी तिनं आपल्याला कोणाचीही भीती वाटत नसल्याचे सांगितले आहे. ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे त्यांची नावे बिनधास्तपणे शेअर करणार असल्याचे सांगितले आहे.

    अद्याप या १४ पैकी कोणीही प्रतिक्रीया दिलेली नाही. त्यामुळे संशय आणखी वाढला आहे. रेवतीच्या प्रकरणाची दखल घेऊन गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा देण्याची मागणी आता चाहते करू लागले आहेत. अभिनेत्रीनं सांगितलं, त्या १४जणांनी केवळ आपल्यावर शाररिक अत्याचार केला नाही तर आपला मानसिक छळही केला आहे. त्या यादीमध्ये तिनं प्रसिध्द निर्माता आणि दिग्दर्शक राजेश यांचेही नाव घेतले आहे. ज्यांनी अनेक नॅशनल अॅवॉर्डही जिंकले आहेत. याबरोबरच डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे नेते नंदू अशोकन यांच्यासह पोलीस खात्यातील अनेक अधिका-यांचीही नावं घेतली आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.