अभिनेत्री रिचा चढ्ढाचा माफिनामा, पाकव्याप्त काश्मीरबाबत वादग्रस्त ट्विट

रिचाने सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. यापूर्वी उत्तरेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासारखे आदेश लागू करण्याचे विधान केले होते. यावर रिचाने उपेंद्र द्विवेदी यांच्या व्हिडिओवर ‘गलवान हाय कह रहा है’ असे ट्विट केले होते. तिच्या या गलवानबाबत ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. रिचाने तिच्या पोस्टमध्ये तिने भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर होत होता.

    मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढाने (Richa Chadha) त्या ट्विटवर अखेर माफी (Apology) मागितली आहे. रिचा चढ्ढाच्या एका ट्विटमुळे वादंग निर्माण झाले होते. या ट्विटवर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी (Lt. Gen. Upendra Dwivedi) आणि भाजपने (BJP) आक्रमक पावित्रा घेत माफी मागावी अशी मागणी केली होती. तसेच, तिला या ट्विटवरून ट्रोलदेखील करण्यात आले आहे. अखेर या ट्रोलिंगनंतर रीचाने ट्विट डिलीट करत माफी मागितली आहे.

    रिचाने सोशल मीडियावर (Social Media) एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. यापूर्वी उत्तरेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासारखे आदेश लागू करण्याचे विधान केले होते. यावर रिचाने उपेंद्र द्विवेदी यांच्या व्हिडिओवर ‘गलवान हाय कह रहा है’ असे ट्विट केले होते. तिच्या या गलवानबाबत (Galwan) ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. रिचाने तिच्या पोस्टमध्ये तिने भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर होत होता.

    रिचाने गलवान केलेल्या या ट्विटवर भाजप देखील आक्रमक झाली होती. भाजपचे मनजिंदर सिंग सिरसा यांनी रिचावर निशाणा साधत, तिचे हे ट्वीट लाजिरवाणे असल्याचे म्हटले होते. अशाप्रकारे आपल्या सैन्याचा अपमान करणे योग्य नाही, त्यामुळे रिचाने ते ट्विट लवकरात लवकर डिलीट करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि भाजपने ट्विटवर आक्षेप घेतल्यानंतर अखेर रिचा चढ्ढाने माफी मागितली आहे.