अभिनेत्री संजना सांघी व आदित्य रॉय कपूर यांचा ‘ओम द बॅटल विदिन’, हा अ‍ॅक्शन चित्रपट 1 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि संजना संघीचा ओम द बॅटल विदइन (Om The Battle Within) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रविवारी या चित्रपटाचे नवीन गाणे रिलीज करण्यात आले. 'सांसे दे आना' नावाच्या या गाण्यात दोघांमधील रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये आदित्य आणि संजना आकर्षक अवतारात दाखवले आहेत. कारण त्यांची केमिस्ट्री वेगळी आहे. हे गाणे निर्माते अहमद खान यांनी कोरिओग्राफ केले आहे. हा चित्रपट 1 जुलै (1 July 2022) रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

    मुंबई : अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि संजना संघीचा (Sanjana Sanghi) ओम द बॅटल विदइन (Om The Battle Within) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रविवारी या चित्रपटाचे नवीन गाणे रिलीज करण्यात आले. ‘सांसे दे आना’ नावाच्या या गाण्यात दोघांमधील रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये आदित्य आणि संजना आकर्षक अवतारात दाखवले आहेत. कारण त्यांची केमिस्ट्री वेगळी आहे. हे गाणे निर्माते अहमद खान यांनी कोरिओग्राफ केले आहे. हा चित्रपट 1 जुलै (1 July 2022) रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.


    ‘ओम द बेटल विदिन’ (Om The Battle Within) या सिनेमाचे पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांना टायगर श्रॉफच्या बागी सिनेमाची आठवण येत आहे. सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे चाहते आता सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. या सिनेमात संजना सांघी आणि आदित्य रॉय कपूर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन कपिल वर्मा यांनी केले आहे. दरम्यान, नुकतेच अभिनेत्री संजनाने या चित्रपटातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 2020 मध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले होते. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. अखेर 2 वर्षांनंतर हा सिनेमा जुलैमध्ये प्रदर्शित होत आहे. आदित्य रॉय कपूरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सिनेमाचे नवीन पोस्टर आणि रिलीज डेटची माहिती चाहत्यांना दिली आहे.