अभिनेत्री शिवानी सुर्वे दिसणार तब्बल ९ वर्षानंतर छोट्या पडद्यावर

शिवानी सुर्वेच्या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. आता प्रेक्षकांमध्ये तिच्या या मालिकेविषयी उत्सुकता वाढली आहे.

  शिवानी सुर्वे : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) ही बरेच वर्ष मालिका विश्वातून सूर होती. अभिनेत्री शिवानी सुर्वी महेश मांजरेकर यांचा प्रसिद्ध रिऍलिटी शो बिग बॉस मराठीमध्ये तिने तिची छाप सोडली. त्याचबरोबर तिने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली. काही महिन्यापूर्वीच ती लग्नबंधनात अडकली. तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवानी तब्बल ९ वर्षानंतर पुन्हा टेलिव्हिजनवर परतणार आहे.

  शिवानी सुर्वेच्या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. आता प्रेक्षकांमध्ये तिच्या या मालिकेविषयी उत्सुकता वाढली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर नव्या मालिकेचे टेलिकास्ट लवकरच होणार आहे. या मालिकेचं नाव ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधून शिवानी तब्बल ९ वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये ती मानसी सणस ही भूमिका साकारणार आहे. अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असलेली मानसी आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर जराही नाही. वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचे साम्राज्य उभे केले आहे अशी अभिनेत्रीची भूमिका दाखवण्यात आली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  कशी आहे मालिकेची कथा
  अभिनेत्री शिवानी सुर्वे ही मानसी सणस या विद्यार्थिनीच्या भूमिकेत आहे. प्रोमोमध्ये सुरुवातीला कॉलेजची टॉपर गायत्री मॅडमच्या हुशारीवर मानसी खूप प्रभावित आहे. तिच्या वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचे साम्राज्य उभे केले आहे. आपल्या मुलीनेही खूप शिकून नाव कमवावे असे त्यांचे स्वप्न आहे. वडिलांचे स्वप्न मानसीला काही करुन पूर्ण करायचे आहे. अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असलेली मानसी आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर जराही जात नाही अशी या मालिकेची कथा सुरुवातीच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आली आहे. ही मालिका १७ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.