adipurush

प्रभासचा ‘आदिपुरुष’ आधी 11ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा येत्या 16 जूनला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे.

  अभिनेता प्रभासच्या (Prabhas) आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाचा पहिला ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. आदिपुरुष या चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमधील डायलॉग्सनं आणि कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. मात्र व्हीएफएक्समध्ये काही चुका असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.(Adipurush Trailer)

  ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील प्रभासच्या ‘रावण आ रहा हूं न्याय के दो पैरों से अन्याय के दस सिर कुचलने, आ रहा हूं अपनी जानकी को ले जाने’ हा डायलॉग लोकांना प्रचंड आवडत आहे. तसेच अनेक जण या ट्रेलरमधील सैफ अली खानच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. ट्रेलरमध्ये जय श्रीराम हे गाणं देखील ऐकायला मिळत आहे.

  ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. हा चित्रपट 16 जून रोजी रिलीज होणार आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीतेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सनी सिंह हा लक्ष्मण ही भूमिका साकारत असून मराठमोळा देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाची भूमिका साकारत आहे.  प्रभासनं सोशल मीडियावर आदिपुरुष या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरला त्यानं ‘हर भारतीय की आदिपुरुष’ असं कॅप्शन दिलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Prabhas (@actorprabhas)

  चित्रपटातील गाणी
  काही दिवसांपूर्वी ‘आदिपुरुष’ या चित्रपटातील जय श्री राम हे गाणं रिलीज झालं. ‘जय श्री राम’ गाण्याचं संगीत दिग्दर्शन  संगीतकार अजय- अतुल यांनी केलं आहे. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत. तसेच या चित्रपटातील राम सिया राम हे आणखी एक गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटामधील जय श्री राम आणि राम सिया राम या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

  प्रभासचा ‘आदिपुरुष’ आधी 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा येत्या 16 जूनला रिलीज होणार आहे.