aditi pohankar

आदिती पोहणकरच्या (Aditi Pohankar) आश्रममधील भूमिकेचं जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. एमएक्स प्लेयरवर ३ जून २०२२ ला आश्रमचा तिसरा सीझन ‘आश्रम 3’  रिलीज होणार आहे.

    आदिती पोहणकरनं (Aditi Pohankar) रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ सिनेमाद्वारे चित्रपट जगतामध्ये पहिलं पाऊल टाकलं. मात्र त्यानंतर आलेल्या ‘शी’ आणि ‘आश्रम’ (Aashram) या हिंदी वेबसीरीजमधल्या तिच्या भूमिकांमुळे ती जास्त लोकप्रिय झाली.  पुढच्या महिन्यात आश्रमचा तिसरा सीझन रिलीज होणार आहे.अशातच ‘आश्रम ३’ चं शूटींग करताना आलेला बॉबी देओलसोबतचा (Aditi Pohankar Experience About Bobby Deol) अनुभव आदितीनं शेअर केला आहे.

    आदिती म्हणाली की, जोपर्यंत माझा शॉट एकदम चांगला होत नाही तोपर्यंत अनेक तास आमची रिहर्सल चालायची. त्यावेळी बॉबी सरांनी मला खूप सपोर्ट दिला. परफेक्ट शॉट मिळेपर्यंत टेक व्हायचे. बॉबी सरांबद्दल आणखी एक गोष्ट मी सांगेन की ते विनोदी असण्यासोबतच विचित्रही आहेत. त्यांच्या स्वभावाचं एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे.

    आदिती पुढे म्हणाली की, बॉबी सर एक उत्तम सहकलाकार आहेत. तिनं सांगितलं की, शूटींगच्या काळात दिवाळीमध्ये पत्ते खेळताना आणि तिखट स्ट्रीट फूड खाताना मजा आली. ते दिवस आमच्या प्रत्येकाच्या कायम स्मरणात राहतील.

    आदितीच्या ‘आश्रम’मधील भूमिकेचं जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. एमएक्स प्लेयरवर ३ जून २०२२ ला आश्रमचा तिसरा सीझन ‘आश्रम 3’  रिलीज होणार आहे.‘आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बाबा निराला ही मुख्य भूमिका बॉबी देओल साकारत आहे. एका ढोंगी बाबाची कथा या वेब सीरीजमध्ये आहे. या वेब सीरीजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला होता. आता प्रेक्षकांना तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे.