aditya narayan and daughter

आदित्य नारायणला (Aditya Narayan) एका चाहत्याने त्याच्या मुलीचे फोटो शेअर (Aaditya Narayan Daughter Photo) करण्याबाबत प्रश्न विचारला होता. यावेळी उत्तर देताना आदित्य म्हणाला होता, त्विषाचे फोटो शेअर करण्यासाठी तिच्या आईची परवानगी घ्यावी लागेल. तसेच आदित्यने लिहिले की,वडीलधारी मंडळी सांगतात त्याप्रमाणे ४० दिवसांनंतरच बाळाचा फोटो दाखवला पाहिजे.

    आदित्य नारायणने (Aditya Narayan) आपल्या मुलीचा म्हणजेच त्विषाचा (Twisha) पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर (Aaditya Narayan Daughter First Photo) केला आहे. ‘त्विषा’ तीन महिन्यांची झाल्यानंतर आदित्यने त्याच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे.

    ‘त्विषा’ तीन महिन्यांची झाल्यानंतर आदित्य आणि श्वेताने तिचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट तयार केले आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून आदित्यचे चाहते ‘त्विषा’ची झलक पाहण्यासाठी आतुरले होते. आता आदित्यने ‘त्विषा’चा क्यूट फोटो चाहत्यांसोबत शेअर केल्याने चाहते आनंदी झाले आहेत.

    आदित्य नारायणने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एक प्रश्नोत्तर सत्र आयोजित केले होते. या सत्रात चाहत्यांनी त्याला सारेगमप शो सोडण्यापासून त्याच्या कुटुंबापर्यंत अनेक प्रश्न विचारले होते. दरम्यान आदित्यला एका चाहत्याने त्याच्या मुलीचे फोटो शेअर करण्याबाबत प्रश्न विचारला होता. यावेळी उत्तर देताना आदित्य म्हणाला होता, त्विषाचे फोटो शेअर करण्यासाठी तिच्या आईची परवानगी घ्यावी लागेल. तसेच आदित्यने लिहिले की,वडीलधारी मंडळी सांगतात त्याप्रमाणे ४० दिवसांनंतरच बाळाचा फोटो दाखवला पाहिजे.