‘मेट्रो इन दिनों’ बघण्यासाठी प्रेक्षकांना बघावी लागेल वाट, आता चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज!

अनुराग बसू दिग्दर्शित हा चित्रपट आता 29 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  भूषण कुमार आणि दिग्दर्शक अनुराग बसू यांच्या ‘मेट्रो इन दिनों’  (Metro In Dino Released Date)या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र या चित्रपटासाठी त्यांना बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. काही दिवसापूर्वी  निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती, परंतु पुन्हा एकदा त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. आता हा चित्रपट यावर्षी 29 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  निर्मात्यांनी आज शुक्रवारी चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली. निर्मात्यांनी कलाकारांचा फोटो एका छोट्या नोटसह शेअर केला आहे ज्यात लिहिले आहे, ‘मेट्रो आजकाल आधुनिक जोडप्यांच्या हृदयस्पर्शी कथांना हायलाइट करत असल्याने प्रेम शहराच्या मध्यभागी आहे. प्रेमाची जादू पाहण्यासाठी तुमच्या कॅलेंडरमध्ये 29 नोव्हेंबरला चिन्हांकित करा. आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, अली फझल आणि फातिमा सना शेख यांसारख्या अविश्वसनीय कलाकारांसह, शहरी रोमान्सच्या प्रवासासाठी तयार व्हा.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by @adityaroykapur

  हा चित्रपट 29 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार असल्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आणि तो 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित करण्याची योजना होती. आता अखेर हा चित्रपट यावर्षी २९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.