३२ वर्षांच्या करियरमध्ये पहिल्यांदाच भाईजन चित्रपटात करणार ‘हे’ काम, वाचून तुम्हालाही आनंद होईल!

दिग्दर्शक राजकुमार गुप्तांच्या चित्रपटात सलमान झळकणार आहे. ‘ब्लॅक टायगर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. प्रसिद्ध भारतीय गुप्तहेर रवींद्र कौशिक यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट असणार आहे.

    अभिनेता सलमान खान सातत्याने अॅक्शन चित्रपटांत दिसत आहे. पण आता त्याने त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच कोणत्यातरी आत्मचरित्रावर आधारीत म्हणजेच बायोपिकमध्ये काम करण्याचं ठरवलं आहे. कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन, रोमॅन्टीक असे सर्वच चित्रपट सलमानने आजवर केले आहेत. तर आता तो बायोपिकमध्ये दिसणार आहे.

    दिग्दर्शक राजकुमार गुप्तांच्या चित्रपटात सलमान झळकणार आहे. ‘ब्लॅक टायगर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. प्रसिद्ध भारतीय गुप्तहेर रवींद्र कौशिक यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे.

    रवींद्र कौशिक यांना चांगला गुप्तहेर मानलं जातं. त्यांना ब्लॅक टायगर म्हणून ओळखलं जायचं. राजकुमार गुप्ता मागील पाच वर्षांपासून त्यांच्या जीवनावर संशोधन करत आहे. आणि त्यांनी एक स्क्रिप्टही तयार केलं आहे. त्यांना आता ते मोठ्या पडद्यावर उतरवायचं आहे. त्यामुळे भाईजानच्या चाहत्यांना तो लवकरच वेगळ्या भूमिकेत दिसू शकतो.