ब्रेकअपनंतर ‘तेरे विच रब दिसदा’ गाण्यात दिसली राकेश आणि शमिताची जबरदस्त केमिस्ट्री, पहा व्हिडिओ…

बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट यांचं नवीन गाणं 'तेरे विच रब दिसदा' यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.

    बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट यांच्या ब्रेकअपच्या वृत्ताने चाहते दु:खी झाले होते. त्याचवेळी त्यांचं ‘तेरे विच रब दिसदा’ हे गाणं आलं त्यामुळे चाहत्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद पाहायला मिळाला. हे एक रोमँटिक गाणं आहे. ज्यामध्ये शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

    त्यांच्या या व्हिडीओ गाण्यात गायक परंपरा आणि सचेतही दिसत आहे. हे गाणं मीत ब्रदर्स, परंपरा आणि सचेत यांनी गायलं आहे. मीत ब्रदर्सने संगीत दिलं आहे. या गाण्याचे बोल मनोज मुंतशीर यांनी लिहिले आहेत. या गाण्याचे दिग्दर्शन आशिष पांडा यांनी केलयं. हे गाणं भूषण कुमारच्या टी-सीरीजवर रिलीज करण्यात आलयं. हे गाणं आतापर्यंत सात लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. त्याच वेळी, 265 हजार लोकांनी हे गाणं खूप पसंत केलं आहे.