maheep kapoor and seema khan

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि अमृता अरोराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह(Kareena Kapoor and Amrita Arora Corona Positive) आली होती. आता त्यांच्यापाठोपाठ महिप कपूर आणि सीमा खानची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Maheep Kapoor And Seema Khan Corona Positive)आली आहे.

    कोरोनाचे(Corona) संकट वाढतच आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि अमृता अरोराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह(Kareena Kapoor and Amrita Arora Corona Positive) आली होती. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक पार्ट्यांना देखील हजेरी लावली होती. आता त्यांच्यापाठोपाठ महिप कपूर आणि सीमा खानची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Maheep Kapoor And Seema Khan Corona Positive)आली आहे.

    महिप कपूर ही ज्वेलरी डिझायनर आहे. तिने संजय कपूरशी लग्न केले आहे. सीमा खान ही फॅशन डिझायनर आहे. त्या दोघीही नेटफ्लिक्सवरील एका सीरिजमध्ये दिसल्या होत्या. संजय कपूरने महिप कपूरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. तिला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. तिने स्वत:ला घरात क्वारंटाइन करुन घेतले असल्याचेही त्याने सांगितले.
    महिप कपूर, सीमा खान, करीना कपूर आणि अमृता अरोरा यांनी एकत्र करण जोहरच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीला मलायका अरोरा, आलिया भट्ट आणि अर्जुन कपूरने देखील हजेरी लावली होती.

    कोरोना नियमांचं उल्लंघन करून बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित राहिल्यामुळेच करिना आणि अमृता यांना कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही अभिनेत्रींमुळे अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता त्यांच्या पाठोपाठ महिप कपूर आणि सीमा खानची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.