
रणबीर कपूरनंतर ईडीने महादेव बेटिंग ॲप प्रकरणात कपिल शर्मा, हुमा खान कुरेशी, हिना यांना समन्स बजावले आहे.
गेल्या दोन दिवसापासून ईडीनं बॅालिवूडच्या कलाकारांना ईडी कार्यालयात (ED) बोलवण्याचा सपाटा लावलाय. आधी ईडीकडून अभिनेता रणबीर कपूरला (ranbir kapoor summoned by ed) समन्स बजावण्यात आलं आज (6 ऑक्टोबर) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. आता ईडीच्या रडारवर आणखी काही सेलिब्रिटी असल्याची माहिती समोर आली आहे. ईडीनं कपिल शर्मा, हुमा कुरेशी, श्रद्धा कपूर,हिना खानलाही ईडीचे समन्स समन्स बजावण्यात आलं आहे. या सोबत अन्य 17 सेलिब्रिटीवर ईडीची खास नजर आहे.
एका दिवसाआधी रणबीर कपूरला बजावलयं समन्स
रणबीर कपूरनंतर ईडीने महादेव बेटिंगॲप प्रकरणात कपिल शर्मा, हुमा खान कुरेशी, हिना यांना समन्स बजावले आहे. महादेव मनी-लाँडरिंग प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयने कपिल शर्मा आणि हिना खान यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे. एक दिवस आधी अभिनेता रणबीर कपूरलाही समन्स बजावण्यात आले होते. कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा शुक्रवारी ईडीसमोर हजर होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सौरभ चंद्राकर प्रकरणाशी संबध
काही दिवसापुर्वी सौरभ चंद्राकर हा ईडीच्या जाळ्यात अडकला होता. भिलाई येथील महादेव बेटिंग ॲप चालवणारा सौरभ चंद्राकर हा चौकशीच्या फेऱ्यात अडकला होता. त्याने कथितपणे त्याच्या स्वत: च्या भव्य लग्नासाठी 200 कोटी रुपये रोख खर्च केले, ज्यात खासगी जेट भाड्याने घेणे आणि सेलिब्रिटी परफॉर्मन्सचा समावेश आहे. या लग्नाला रणबीरने कपूरसह अनेक सेलेब्रिटिंनी हजेरी लावली होती, असंही म्हटलं जात आहे. सौरभवर स्टार्सना पैसे दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात रणबीर कपूरच्या आधी 14 बॉलिवूड स्टार्सची नावे समोर आली होती. या यादीत सनी लिओनीपासून नेहा कक्करपर्यंतच्या सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.