‘रिप्ड शर्टबद्दल बोलायला हवं’, अदनान सामीने केली मजेशीर पोस्ट, सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

या पोस्टमध्ये अदनान म्हणाला आहे,” कारण आपण अलिकडे प्रत्येक गोष्टीमध्ये चिंता व्यक्त करत आहोत. मग ती आपल्या कामाची असो वा नसो. आपण फाटक्या शर्टबद्दल चिंता व्यक्त करू शकतो का?” अशी उपहासात्मक पोस्ट लिहली आहे.

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या फाटक्या जिन्सवरील वक्तव्यामुळे सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा रंगताना दिसतेय. मात्र यात आता गायक अदनान सामी यानं एक मजेशीर पोस्ट करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अदनान सामी याने ट्विटरवर एक फोटो शेअर करत पोस्ट लिहली आहे. अदनान सामीने शेअर केलेल्या फोटोत एकीकडे एका मुलीचे फक्त पाय दिसत असून तिने रिप्ड म्हणजेच फाटलेली जीन्स घातल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे एका पुरुषाचं त्याच्या शर्टमधून पोट दिसत असल्याचं पाहायला मिळतंय. एका जाड व्यक्तीच्या शर्टच्या बटनांमधून त्याचं पोट दिसतंय हे दाखवण्याचा अदनानने प्रयत्न केला आहे.

    या पोस्टमध्ये अदनान म्हणाला आहे,” कारण आपण अलिकडे प्रत्येक गोष्टीमध्ये चिंता व्यक्त करत आहोत. मग ती आपल्या कामाची असो वा नसो. आपण फाटक्या शर्टबद्दल चिंता व्यक्त करू शकतो का?” अशी उपहासात्मक पोस्ट लिहली आहे.

    फाटकी जीन्स घालून फिरणारी महिला कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल, असं विधान रावत यांनी केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका झाली. टीकेचे धनी ठरल्यानंतरही रावत यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे.