सलमान खाननंतर, राखी सावंतच्या बॉयफ्रेंडला जिवे मारण्याच्या धमक्या, अभिनेत्री म्हणाली- ‘आधी मला मारा…’

राखीचा प्रियकर आदिलला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं तिने म्हटलं आहे. बिश्नोई टोळीकडून तिला धमकावले जात असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे.

    राखी सावंत आणि तिचा प्रियकर आदिल खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. या सगळ्या दरम्यान राखीने एका नवीन व्हिडिओमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. राखीचा प्रियकर आदिलला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं तिने म्हटलं आहे. बिश्नोई टोळीकडून तिला धमकावले जात असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. ‘ड्रामा क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राखीने एका व्हिडिओमध्ये आदिल खानकडून फोनवर आलेल्या धमक्या दाखवल्या आहेत. बिष्णोई टोळीकडून आपल्याला धमकावण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. व्हिडिओमध्ये राखी बिश्नोई टोळीला धमकावते आणि आदिलपासून दूर राहण्यास सांगते.

    त्याचवेळी ती म्हणताना दिसली की, ‘प्रेम करणं गुन्हा आहे का? आम्हा दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही काय चूक केली आहे? आम्हाला धमक्या का दिल्या जात आहेत? मी आदिलशिवाय राहू शकत नाही. तुम्ही कधी कोणावर प्रेम केले आहे का? कृपया हे गांभीर्याने घ्या. तू माझ्यासाठी भावासारखा आहेस, तुझ्या बहिणीचा संसार तोडण्याऐवजी घडवण्यास मदत कर.’

    दाऊद हसन नावाच्या कथित व्यक्तीकडून ही धमकी आली होती आणि त्यावर ‘राखीपासून दूर राहा, आम्ही तुला मारून टाकू, बिश्नोई गँगची धमकी’ असं लिहिलं होतं.