पुन्हा रंगली रिया चक्रवर्तीची सोशल मीडियावर चर्चा, सहा महिन्यांनंतर शेअर केला हातात हात घेतलेला ‘तो’ फोटो!

रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोच तिने एक हात तिच्या हातात घट्ट पकडल्याचं दिसतं आहे. रियाने तिच्या आईचा हात पकडला आहे.

  आज जागतिक महिला दिन सगळीकडे साजरा केला जातोय. अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावरून चाहत्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  आज महिला दिनानिमित्ताने रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

  रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोच तिने एक हात तिच्या हातात घट्ट पकडल्याचं दिसतं आहे. रियाने तिच्या आईचा हात पकडला आहे. “आम्हाला महिला दिनाच्या शभेच्छा.. आई आणि मी.. कायम एकत्र..माझी ताकद, माझा विश्वास, माझं मनोबलं – माझी आई” असं कॅप्शन रियाने या फोटोला दिलंय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

  सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर रिया चक्रवर्तीने सोशल मीडियाकडे सक्रीय नव्हती. ऑगस्ट २०२० मध्ये रियाने शेवटची सोशल मीडिया पोस्ट केली होती. त्यानंतर जवळपास 6 महिन्यांनी तिने पुन्हा जागतिक महिला दिनाचं निमित्त साधत इन्स्टाग्राम पोस्ट केलीय.

  दरम्यान, सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने न्यायालयासमोर ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. ३० हजार पानांच्या या आरोप पत्रांमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावासह ३३ जणांची नावं आहेत.