संपूर्ण मुलाखत झाल्यानंतर रणवीर सिंगला मुलाखत घेणाऱ्याने विचारले Who are you?; पहा काय म्हणाला रणवीर

    शनिवारी दुबईमधील अबुदाबी येथे एका पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग याने हजेरी लावली. यावेळी फॉर्म्युला वन रेसमधील मार्टिन ब्रंडल यांनी धावत्या भेटीत रणवीरची मुलाखत घेतली. यावेळी संपूर्ण मुलाखत घेतल्यांनंतर मार्टिन ब्रंडल यांनी रणवीरला तू कोण आहेस असे विचारले. यावर रणवीरने दिलेले उत्तर आणि मुलाखतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

    व्हिडिओत पहायला मिळते की दुबईतील एका सोहोळ्यादरम्यान जेव्हा ब्रंडल कार्यक्रमात रणवीरला भेटला आणि त्याला विचारले की तो कसा आहे, तेव्हा अभिनेता म्हणाला, “जगाच्या शीर्षस्थानी. मी उत्साह अनुभवत आहे. त्यानंतर मार्टिन रणवीरला म्हणाला, “मी क्षणभर विसरलो की तू कोण आहेस, तू मला सांगशील का?” त्यावर रणवीरने उत्तर दिले, “सर, मी बॉलिवूड अभिनेता आहे. मी मूळचा मुंबई, भारताचा आहे.”

    सोहोळ्यादरमायन झालेल्या घाईगडबडीत मुलाखतकाराच्या भूमिकेत असलेला मार्टिन ब्रंडल यांच्याकडून रणवीरचे नाव विसरण्याची चूक झाली परंतु ही चूक अभिनेता रणबीर सिंगने देखील प्रांजळपणाने स्वीकारत परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल अभिनेत्याचे कौतुक होत आहे.