‘वीरे दी वेडींग २’ नंतर रिया करणार हर्षवर्धनसाठी ‘रोम-कॉम’!

आगामी प्रोजेक्ट ती भाऊ हर्षवर्धन कपूरसोबत करणार असल्याची माहिती मिळाली आहे. रियाला आपला आगामी रोम-कॉम हर्षवर्धनसोबत करायचा आहे.

    ‘आयशा’, ‘खुबसूरत’ आणि ‘वीरे दी वेडींग’ या चित्रपटांची निर्मिती करणारी अनिल कपूर कन्या आणि सोनम कपूरची बहिण रिया कपूरनं काही दिवसांपूर्वीच ‘वीरे दी वेडींग २’ची घोषणा केली आहे. यासोबतच ती आणखी काही प्रोजेक्टसवरही काम करत आहे. आगामी प्रोजेक्ट ती भाऊ हर्षवर्धन कपूरसोबत करणार असल्याची माहिती मिळाली आहे. रियाला आपला आगामी रोम-कॉम हर्षवर्धनसोबत करायचा आहे.

    या चित्रपटाची स्क्रीप्ट तिला आवडल्याचं समजतं. हा जरी रोम-कॉम असला तरी यात कॉमेडीला खूप वाव असून, हर्षचा कॉमिक सेन्स खूप चांगल्या असल्याचं रियाचं मत आहे. या चित्रपटात हर्षवर्धनची जोडी आलया एफसोबत जमवण्याची रियाची योजना आहे. आजच्या तरुण अभिनेत्रींमध्ये आलया खूप छान असल्याचं रियाला वाटतं.

    आलयालाही या चित्रपटाची संकल्पना आवडली असून, यात अभिनय करण्यासाठी ती तयार असल्याचं समजतं. बऱ्याचशा गोष्टी नक्की झाल्यानं आता या चित्रपटाची अधिकृत घोषणा कधी केली जाते आणि शूट कधी सुरू होतं ते पहायचं आहे.