serial set

ऐतिहासिक मालिका इतर मालिकांपेक्षा वेगळ्या असतात. पडद्यावरचे दृश्य खरेखुरे वाटावे यासाठी अत्यंत नेमकेपणाने दृक् सौंदर्य साकारावे लागते. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील आगामी भव्य ऐतिहासिक मालिका पुण्यश्लोक अहिल्याबाई नववर्षाची प्रेरणादायक सुरुवात करत ४ जानेवारीपासून पडद्यावर येण्यास सज्ज आहे. या मालिकेत इतिहासातील एक महत्त्वाचे प्रकरण जिवंत करण्यात आले आहे, ज्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांची जीवनगाथा मांडली आहे.

ऐतिहासिक मालिका इतर मालिकांपेक्षा वेगळ्या असतात. पडद्यावरचे दृश्य खरेखुरे वाटावे यासाठी अत्यंत नेमकेपणाने दृक् सौंदर्य साकारावे लागते. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील आगामी भव्य ऐतिहासिक मालिका पुण्यश्लोक अहिल्याबाई नववर्षाची प्रेरणादायक सुरुवात करत ४ जानेवारीपासून पडद्यावर येण्यास सज्ज आहे. या मालिकेत इतिहासातील एक महत्त्वाचे प्रकरण जिवंत करण्यात आले आहे, ज्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांची जीवनगाथा मांडली आहे. या मालिकेसाठी योग्य दृक् सौंदर्य साकारण्यासठी निर्मात्यांनी तब्बल सहा महीने व्यापक संशोधन केले आणि पुढील सहा महीने अगदी सुरुवातीपासून सेट तयार करण्यात खर्ची केले. या सेटचे डिझाइन तयार करताना, डिझाइनर्सनी सेट डिझाइन करतानाच डिझाइनच्या इतर घटकांची, जसे की, पोशाख, प्रकाश आणि अगदी प्रॉपचा देखील कसून विचार केला, जेणे करून 18व्या शतकाचा काळ हुबेहूब साकारावा.

serial set

सेट उभारण्याच्या प्रेक्रियेबद्दल बोलताना कला दिग्दर्शक नरेंद्र राहुरीकर म्हणाले, “हा सेट तयार करताना आमची प्रेरणा होती, १५-१८ व्या शतकातील मराठी-माळवा संस्कृती. मी यापूर्वी काही पौराणिक मालिकांसाठी काम केलेले आहे पण ही माझी पहिलीच ऐतिहासिक मालिका आहे, आणि मी म्हणेन की, हा अगदीच वेगळा अनुभव आहे. पौराणिक मालिकांमध्ये कलात्मक स्वातंत्र्य घेता येते, पण इथे मात्र जास्तत जास्त अचूक आणि नेमके असण्यावर आमचा भर असतो कारण त्याची सहज तुलना केली जाते. सेट डिझाइन अस्सल दिसण्यासाठी आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पार्श्वभूमीसाठी पडदे आणि महालतील इतर फर्निचरसाठी अस्सल आणि उच्च दर्जाचे महेश्वरी वस्त्र वापरले आहे.”

या मालिकेतील सेट डिझाइनबद्दल पुढे बोलताना दिग्दर्शक जॅक्सन सेठी म्हणाले, “सेट डिझाइन हा केवळ सेटिंग लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा कालसूचक म्हणून नाही, तर मालिकेतील मुख्य संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील एक महत्त्वाचा पैलू आहे. माझा असा विश्वास आहे की, कथानकाच्या मांडणीत सेटची भूमिका मोठी असते. बर्‍याच लोकांचा असा समज असतो की, चांगल्या कथा-मांडणीसाठी फक्त एक चांगली पटकथा आणि उत्कृष्ट अभिनय असणे पुरेसे असते, पण मी ही गोष्ट ठामपणे सांगू शकतो की, चांगल्या कथा-मांडणीसाठी त्या मालिकेत काम करणारा प्रत्येक विभाग उत्कृष्ट असावा लागतो, मग तो अभिनय असो, लेखन असो, वेशभूषा असो, कला विभाग असो किंवा कॅमेरा असो. जर दृश्ये अचूक किंवा चपखल नसतील, तर त्यामुळे संपूर्ण कथा विस्कळीत होते. यामुळेच, पुण्यश्लोक अहिल्याबाई साठी सेट उभारताना तो अगदी अस्सल आणि राजेशाही असावा याबाबत आमचा कटाक्ष होता.

त्यामुळे आमच्या या मालिकेसाठी साजेसा सेट उभारायला आम्हाला बराच जास्त वेळ लागला. आम्ही प्रेक्षकांना थेट त्या काळात घेऊन जाऊ इच्छितो, जेथे ते अहिल्याबाई होळकरांचा जीवनप्रवास आणि त्याचे वैभव अनुभवू शकतील.”