रश्मिका मंदनाचा फेक व्हिडिओ व्हायरल, अमिताभ बच्चन संतापले, कडक कारवाईची केली मागणी!

रश्मिकाचा हा बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहते संतापले. वास्तविक व्हिडिओमध्ये ती रश्मिका नसून झारा पटेल आहे.

    नॅशनल क्रश म्हणून ओळख असलेली अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सोशल मीडियावर नेहमीचं चर्चेत असते. तिचा आगामी अॅनिमल चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र, रश्मिका सध्या वेगळ्याचं कारणानं चर्चेत आली आहे. सध्या इंटरनेट वर एक एडिट केलेला व्हिडिओ ( Rashmika Mandana fake video) व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी हुबेहुब रश्मिका सारखी दिसत आहे. हा बोल्ड व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड संताप आहे. मात्र, व्हिडिओमधे रश्मिका नसून तिचा व्हिडिओ एडिट करून लीक करण्यात आला आहे. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी ही हा व्हिडिओ शेअर करत, कारवाई कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    अमिताभ बच्चन यांनी कारवाईची  केली मागणी

    व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रश्मिका मंदान्ना?

    शुक्रवारी रश्मिका मंदान्नाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. या क्लिपमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाच्या डीप नेक टाइट जिम वेअरमध्ये लिफ्टच्या आत आल्याचे दिसत आहे. रश्मिकाचा हा बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहते संतापले. वास्तविक व्हिडिओमध्ये ती रश्मिका नसून झारा पटेल आहे.