बॅालिवूडच्या सिंघमबाबत मोठी बातमी! अ‍ॅक्शन सीनच्या शुटींग दरम्यान अजय देवगण जखमी

मात्र, थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर अजयने लवकरच शुटींग पुन्हा सुरू केली.

  अजय देवगण (Ajay Devgan) त्याच्या आगामी ‘सिंघम अगेन’ (Singham Again) या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षक चित्रपटाबद्दल उत्साही आहेत. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर्स रिलीज करण्यात आलं, जे पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. सध्या अभिनेता अजय देवगण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, या चित्रपटात अ‍ॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे.

  शूटिंग दरम्यान दुखापत

  दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि त्याची टीम नुकतेच विलेपार्ले येथे या चित्रपटाचे शूटिंग करत होती. एका अ‍ॅक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगण एका कॉम्बॅट सीनचे शूटिंग करत असताना चुकून अभिनेत्याच्या चेहऱ्यावर आघात झाला, त्यामुळे त्याच्या डोळ्याला दुखापत झाली.

  ब्रेकनंतर शुटींग पुन्हा सुरू झाले

  रिपोर्टनुसार, शुटींग दरम्यान जखमी झाल्यानंतर अजयने काही तासांसाठी विश्रांती घेतली आणि डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. यावेळी रोहितने खलनायकांचा समावेश असलेले इतर सीन शूट केले. मात्र, थोडा वेळ  विश्रांती घेतल्यानंतर  अजयने लवकरच शुटींग पुन्हा सुरू केली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

  चित्रपटाची स्टार्सकास्ट

  चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत असून करीना कपूर खान आणि दीपिका पदुकोण यांचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर रणवीर सिंग आणि अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, टायगर श्रॉफ, सोनू सूद, प्रकाश राज, फरदीन खान, जॅकी श्रॉफ, रणवीर सिंग आणि सिद्धार्थ जाधव देखील या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहे.