rakul ajay and siddharth in thank god

अजय देवगणप्रमाणेच(Ajay Devgan) सिद्धार्थ मल्होत्रा(Siddharth Malhotra) आणि रकुल प्रीत सिंग(Rakul Preet Singh) हे दोघेही आपापल्या आगामी चित्रपटांच्या कामात प्रचंड बिझी आहेत. ‘थँक गॅाड’ (Thank God Movie)या चित्रपटात तिघेही एकत्र झळकणार आहेत.

    बॅालिवूडमध्ये सध्या चर्चेत असलेले तीन मोठे चेहरे ‘थँक गॅाड’(Thank God) म्हणत एकाच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अजय देवगणप्रमाणेच(Ajay Devgan) सिद्धार्थ मल्होत्रा(Siddharth Malhotra) आणि रकुल प्रीत सिंग(Rakul Preet Singh) हे दोघेही आपापल्या आगामी चित्रपटांच्या कामात प्रचंड बिझी आहेत. ‘थँक गॅाड’ (Thank God Movie) या चित्रपटात तिघेही एकत्र झळकणार आहेत. भूषण कुमार, इंद्र कुमार आशोक ठाकेरीया यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पक्की(Thank God Release Date) करण्यात आली आहे. २९ जुलै २०२२ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्णय ‘थँक गॅाड’च्या निर्मात्यांनी घेतला आहे.

    ‘थँक गॅाड’ या चित्रपटात दिग्दर्शक इंद्र कुमार रिफ्रेशींग आणि रिलेटेबल स्टोरी सादर करणार आहेत. हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा असून, एक सुरेख संदेशही जनमानसांपर्यंत पोहोचवणारा आहे. एखादी मनासारखं गोष्ट घडली किंवा एखादं संकट दूर झाल्यावर अनेकांच्या मुखातून आपोआपच ‘थँक गॅाड’ हे दोन दिलासा देणारे शब्द बाहेर पडतात. या चित्रपटाच्या टायटलमध्ये मात्र हे शब्द कोणत्या अर्थानं वापरण्यात आले आहेत ते चित्रपट पाहिल्यावरच समजणार आहे. टी-सीरीज फिल्म्स आणि मारुती इंटरनॅशनल प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.