अजय देवगणचा दृश्यम -2 ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अभिषेक पाठक दिग्दर्शित, या चित्रपटात अजय देवगण, अक्षय खन्ना, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इशिता दत्ता यांच्या दमदार भूमिका दिसणार आहेत. चित्रपटाची संपूर्ण टीम आज हैदराबादमध्ये या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे.

    अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn), अभिनेत्री तब्बू (Tabbu) आणि श्रिया सरन (Shriya Saran) यांची मुख्य भूमिका असलेला ‘दृश्यम -२’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून १८ नोव्हेंबरला रिलीज चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

    2015 मध्ये आलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागालाही प्रेक्षकांच्या पसंती दर्शवली होती. त्यांनतंर या चित्रपटाचा दुसरा भागाची घोषणा करण्यात आली. चाहते आणि प्रेक्षकही या चित्रपटाच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून १८ नोव्हेंबरला चित्रपट बघता येणार आहे.