कॉफी विथ करणच्या शोमध्ये अजय देवगणने केले नेपोटिझमवर भाष्य

करणच्या शोमध्ये बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन आणि इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्माता रोहित शेट्टी आले आहेत.

  कॉफी विथ करण सीझन ८ : हॉटस्टारवरचा सर्वात लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण सीझन ८’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. हा शो करण जोहरचा लोकप्रिय शो आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक बॉलीवूडमधील सेलिब्रेटी भाग घेत असतात. यावेळी करणच्या शोमध्ये बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन आणि इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्माता रोहित शेट्टी आले आहेत. दोन्ही सेलिब्रिटींनी त्यांच्या विनोदबुद्धीने आणि विनोदी उत्तरांनी हा भाग खूप मनोरंजक बनवला आहे.

  कॉफी विथ करणच्या शोमध्ये अजय देवगणने नेपोटिझमच्या मुद्द्यावर आपले मत मांडले आहे. त्याने शोचा होस्ट करण जोहरला सांगितले की, ‘तुम्ही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित असाल किंवा नसाल, संघर्ष हा प्रत्येकासाठी समान असतो आणि प्रत्येकाला तितकेच कठोर परिश्रम करावे लागतात. आजही आम्ही खूप मेहनत करतो. पण लोकांना हे दिसत नाही. त्या लोकांना वाटते की आपल्याला सर्व काही अगदी सहज मिळाले आहे. यानंतर अजय रोहित शेट्टीकडे बोट दाखवत म्हणतो की त्याचा संघर्ष बघा, जेव्हा तो इंडस्ट्रीत नवीन होता तेव्हा तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असे. त्यावेळी त्याच्याकडे जेवणासाठी पैसे नसतात. पण आज जेव्हा तो बॉलीवूडचा मोठा दिग्दर्शक बनला आहे, तेव्हा लोकांना वाटते की त्याने किती मेहनत घेतली असेल… या चॅट शोमध्ये अजय देवगणने त्याचे वडील वीरू देवगणबद्दलही अनेक खुलासे केले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Karan Johar (@karanjohar)

  अभिनेत्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलताना, तो लवकरच रोहित शेट्टीसोबत त्याच्या सिंघम फ्रँचायझी ‘सिंघम अगेन’चा पुढचा भाग घेऊन येणार आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात अजयशिवाय टायगर श्रॉफ, करीना कपूर खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि अक्षय कुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.