असं तयार झालं तुमच्या लाडक्या मुक्ता आणि उमेशच्या मालिकेचं शिर्षकगीत!

 या मालिकेचं शीर्षकगीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, पण त्या शीर्षकगीताचं चित्रीकरण कसं झालं, याचा व्हिडिओ नुकताच आला आहे. 

    मुक्ता बर्वे आण उमेश कामत ही जोडी लवकरच छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा दिसणार आहे. दोघंही ‘अजूनही बरसात आहे’ या नव्या कोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ही मालिका सोनी मराठीवरून प्रसारित होणार आहे. ख्यातनाम अभिनेत्री मुक्ता बर्वे प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. एखादे नाते संपले तरी प्रेम संपत नाही असे म्हटले जाते, याच ओळीला साजेशी असे या मालिकेचे कथानक असणार आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

    या मालिकेचं शीर्षकगीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, पण त्या शीर्षकगीताचं चित्रीकरण कसं झालं, याचा व्हिडिओ नुकताच आला आहे.  ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. देवकी पंडित यांनी अनेक वर्षांनी शीर्षकगीतासाठी गायन केलं आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

     

    अजूनही बरसात आहे’ ही मालिका सोनी मराठीवर १२ जुलैपासून प्रसारित केली जाणार आहे. उमेश कामत आणि मुक्ता बर्वे या दोघांचा आपला असा एक खास चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्यांना छोट्या पडद्यावर परतताना बघून चाहते जाम खुश आहेत. सध्या सोशल मीडियावर या प्रोमोचं आणि मालिकेच्या विषयाचं कौतुक केलं जात आहे.