akshay kumar

मिळालेल्या माहितीनुसार साजिदने पुन्हा एकदा अक्षय कुमारची निवड केली असून, त्याच्या जोडीला अहान शेट्टी दिसणार आहे.

    अलीकडच्या काळात प्रत्येक दिवसागणिक अक्षय कुमारची काही ना काही नवीन बातमी येत आहे. आता पुन्हा एकदा तो एका नव्या चित्रपटामुळं चर्चेत आला आहे. निर्माता साजिद नाडियादवाला सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्लॅनिंगमध्ये व्यग्र आहेत. साजिदच्या प्रत्येक चित्रपटातील स्टारकास्ट कमालीची असल्यानं त्यांच्या या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार याबाबत उत्सुकता होती. मिळालेल्या माहितीनुसार साजिदने पुन्हा एकदा अक्षय कुमारची निवड केली असून, त्याच्या जोडीला अहान शेट्टी दिसणार आहे.

    तसं पाहिलं तर अक्षय आणि अहान सध्या साजिदच्या इतर दोन चित्रपटांमध्ये काम करत आहेत. साजिदच्या ‘बच्चन पांडे’मध्ये अक्षय टायटल रोलमध्ये आहे, तर ‘तडप’मध्ये अहान मुख्य भूमिकेत आहे. साजिद यांच्या आगामी चित्रपटाबाबत फारशी माहिती मिळालेली नसली तरी लवकरच यावरूनही पडदा उठेल. हा चित्रपट अक्षय-अहानचा अॅक्शन पॅावरपॅक असल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं. या चित्रपटाच्या निमित्तानं अक्षय आणि अहान प्रथमच एकत्र आले आहेत.

    अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नसून, लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ‘बच्चन पांडे’च्या निमित्तानं अक्षय दहाव्यांदा साजिदच्या चित्रपटात काम करत असून, अहानसोबतचा चित्रपट अकरावा असेल.