राम सेतू’च्या चित्रीकरणाला सुरुवात, अक्षयचा फर्स्ट लूक आला समोर, चाहत्यांनी दिल्या या कमेंट्स!

अक्षय कुमारचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. चष्मा, काहिसे पांढरे झालेले वाढलेले केस आणि गळ्यात स्कार्फ असा अक्षयचा लूक यात दिसून येतोय.

  अक्षय कुमारने त्याचा ‘राम सेतू’ सिनेमातील लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अक्षयन फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे, ” माझ्यासाठी सर्वात खास असलेल्या एका सिनेमाचा प्रवास आज पासून सुरू. ‘राम सेतू’च्या चित्रीकरणाला सुरुवात. सिनेमात एका पुरातत्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारतोय. माझ्या लूकवर तुमची मत जाणून घ्यायला आवडेल. हे माझ्यासाठी नेहमीच महत्वाचं आहे.” असं म्हटलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

  अक्षय कुमारचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. चष्मा, काहिसे पांढरे झालेले वाढलेले केस आणि गळ्यात स्कार्फ असा अक्षयचा लूक यात दिसून येतोय. अभिषेक शर्मा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरुचा या दोघी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. परंतु, त्यांचे लूक्स अद्याप गुलदस्त्यात आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

   

  मात्र अक्षयच्या लूकनंतर या सिनेमाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता वाढली आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा, भारताचं प्राचीन काळातलं महत्त्व, भारताचा समृद्ध वारसा यावर भाष्य करणारा हा सिनेमा असणार आहे.