akshay kumar in raksha bandhan

 ‘रक्षाबंधन’ (Rakshabandhan) हा नात्यांवर भाष्य करणारा सिनेमा आहे. डिसेंबर महिना संपायला काही दिवस बाकी आहेत अशातच 2022 वर्षाला निरोप देताना ‘झी सिनेमा’ (Zee Cinema) ही वाहिनी ‘रक्षाबंधन’ (Rakshabandhan World Tv Premier)च्या जागतिक टीव्ही प्रीमिअरद्वारे कौटुंबिक जिव्हाळ्याच्या भावनेला जागं करण्याचा प्रयत्न करत आहे.

  आज २४ डिसेंबर रोजी रात्री ८.०० वाजता ‘झी सिनेमा’(Zee Cinema) वर ‘रक्षाबंधन’ (Rakshabandhan World Television Premier) चा जागतिक टीव्ही प्रीमिअर प्रसारित केला जाणार आहे. त्यानिमित्ताने अक्षय कुमारची (Akshay Kumar Interview) ही खास मुलाखत.

  तुला या चित्रपटातील सर्वात आवडलेली गोष्ट कोणती ?
  – रक्षाबंधनमधला साधेपणा ही त्याची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. चित्रपट पाहताना मी सहसा रडत नाही, पण या चित्रपटाने मात्र मला भावूक केलं. चित्रपट पाहताना माझ्या हेही लक्षात आलं की आपण सर्वजण किती वेगात एकमेकांपासून दूर होत चाललो आहोत आणि आपण आपल्या नात्यांना किती कमी वेळ देत आहोत. भावंडं किंवा त्यांच्यातील नातेसंबंधांवर गेल्या काही वर्षांत कोणीच चित्रपट तयार केलेला नाही. यात त्याचं अतिशय सुंदरपणे सादरीकरण करण्यात आलं आहे. त्यातील भावना या सच्चा आहेत. त्यातील रडणं हे खरं, आहे. त्याची कथाही विश्वासार्ह आहे. या चित्रपटातील हुंड्याची गोष्ट आणि अन्य सर्व प्रथा हे सर्व आजही घडताना दिसणार वास्तव आहे. अनेक लोकांना आपण आपलीच कथा पाहतो आहोत, असं वाटेल, याचा मला विश्वास वाटतो. अशा या चित्रपटात मला भूमिका साकारण्याची संधी मिळाली, हा मी माझा गौरव समजतो आणि त्यात भूमिका करताना मी खूप रोमांचित झालो होतो.

  यातील लाला केदारनाथ अगरवालच्या भूमिकेत तू आपल्यातील कोणते गुण आणले आहेस?
  – मला ही व्यक्तिरेखा निश्चितच पटली आहे. माझीही मूल्यं लाला उर्फ केदारनाथसारखीच आहेत, असं मला वाटतं. त्यामुळेच त्यात मला प्रेम आणि काळजीची भावना सहजपणे व्यक्त करता आली. लालाप्रमाणेच मीसुध्दा एक कुटुंबवत्सल व्यक्ती, एक फॅमिली मॅन आहे. माझं माझ्या खऱ्या बहिणीशी खूप घनिष्ठ नातं आहे. त्यामुळे या चित्रपटाने माझ्या मनात आमच्या बालपणीच्या अनेक आठवणी जाग्या केल्या. या चित्रपटाने माझ्या मनाची तार छेडली आहे. आर्थिकदृष्ट्या सशक्त होण्यासाठी सतत अथक काम करावं लागतं. कुटुंबाची जबाबदारी काय असते, ते मला चांगलं कळतं. त्यामुळे आमच्या व्यक्तिरेखांमध्ये फरक असला, तरी मला लाला केदारनाथमध्ये माझं बरंचसं प्रतिबिंब पडलेलं दिसतं.

  तू जे चित्रपट स्वीकारतोस, त्यात कुटुंब असणं हे किती महत्त्वाचं असतं?
  – भूमिका किंवा चित्रपट स्वीकारताना मी त्याचा विचार करत नाही, पण कुठेतरी मनात त्याचा माझ्यावर परिणाम होत असतो. मला विविध प्रकारच्या रंजक भूमिका साकारायच्या असल्या, तरी चित्रपटाद्वारे दिला जाणारा संदेश आणि त्याचं भावी आर्थिक यश लक्षात घेऊन मी कुटुंबाभिमुख चित्रपटांना नक्कीच प्राधान्य देतो. मी ज्या चित्रपटामध्ये भूमिका साकारणार आहे, ते चित्रपट संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून बघता येतील की नाही, याचा मी जरूर विचार करतो. चित्रपट पाहताना कुटुंबातील सदस्यांना अवघडल्यासारखं वाटता कामा नये.

  यातील विविध कलाकारांबरोबर एकत्र भूमिका साकारतानाचा अनुभव कसा होता? विशेषत: भूमी पेडणेकर आणि आनंद राय यांच्याबरोबरच्या दुसऱ्या चित्रपटाचा अनुभव कसा होता?
  – माझी सहकलाकार आणि मैत्रीण असलेल्या भूमीबद्दल मला वाटणारा आदर आणि कौतुक यांच्यात वाढच झाली आहे. चार बहिणी असलेल्या चित्रपटात भूमिका स्वीकारण्यासाठी तुम्हाला स्वत:वर विश्वास असावा लागतो. तिच्याबरोबर पुन्हा भूमिका साकारताना मला खूपच मजा आली.

  आनंद सरांबद्दल बोलायचं झाल्यास, मी त्यांचं वर्णन एका ऊबदार मिठीशी करीन. ते सोबत असले, की माझ्या मनात तशी दिलासादायक भावना जागृत होते. आपल्या कामाबद्दल ते अतिशय गंभीर आणि उत्साही असतात. मला त्यांची ही भावना निश्चितच समजते. त्यांच्या व्यक्तिरेखांशी सुसंगत नसणारी गोष्ट ते तुम्हाला करूच देत नाहीत. आमचे सूर बरोबर का जुळतात, कारण आमच्यात साधी राहणी, खाण्याबद्दल प्रेम, नेहमी आनंदी राहणं अशा अनेक गोष्टी समान आहेत.