अक्षय कुमारच्या गोरखा चित्रपटाचे पोस्टर रिलीज, माजी गोरखा अधिकाऱ्याने ट्वीट करत दाखवली मोठी चूक

नुकताच सोशल मीडियावर अक्षय कुमारने गोरखा चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्याने हे पोस्टर शेअर करत, कधी कधी तुमच्या समोर अशा कथा येतात, ज्या तुम्हाला प्रेरणादायी वाटतात. त्यावर काम करण्याची तुमची इच्छा होते, असे लिहिले आहे. अक्षयच्या आगामी चित्रपटातील हे पोस्टर गोरखा रायफल रेजिमेंटचे अधिकारी मेजर माणिक एम जोली यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करतेवेळी त्यांनी एक गंभीर चूक सर्वांच्या नजरेस आणून दिली.

    बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘गोरखा’ असून चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. मात्र या पोस्टरमध्ये माजी लष्कर अधिकारी मेजर माणिक एम जोली यांनी एक चूक सांगितली आहे. “ही चूक गंभीर असून याप्रकरणी लक्ष द्यावे,” असा सल्लाही त्यांनी अक्षयला दिला आहे. विशेष म्हणजे अक्षयनेही यावर प्रतिक्रिया देत “यापुढे मी काळजी घेईन,” असे सांगितले आहे.

    नुकताच सोशल मीडियावर अक्षय कुमारने गोरखा चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्याने हे पोस्टर शेअर करत, कधी कधी तुमच्या समोर अशा कथा येतात, ज्या तुम्हाला प्रेरणादायी वाटतात. त्यावर काम करण्याची तुमची इच्छा होते, असे लिहिले आहे. अक्षयच्या आगामी चित्रपटातील हे पोस्टर गोरखा रायफल रेजिमेंटचे अधिकारी मेजर माणिक एम जोली यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करतेवेळी त्यांनी एक गंभीर चूक सर्वांच्या नजरेस आणून दिली.

    काय म्हणालंय माजी अधिकाऱ्याने

    अभिनेता अक्षय कुमारने चित्रपटाचा पोस्टर शेअर केला होता. त्यात त्याच्या हातात गोरखांची ओळख मानली जाणारी खुकरी होती. पण त्याची खुकरी हातात पकडण्याची पद्धत चुकली होती. तीच चूक एक्स गोरखा ऑफिसरच्या लक्षात आली आहे. त्यानंतर त्यांनी अक्षय कुमारला टॅग करत ट्वीट केले आहे आणि लिहिले,”प्रिय अक्षय कुमारजी एक्स गोरखा ऑफिसरच्या नात्याने हा चित्रपट बनविल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. पण कृपा करुन खुकरी नीट पकडा. खुखरीचा धारवाला भाग दुसऱ्या बाजूला पकडा. ही तलवार नाही. तसेच त्यांनी खुकरीचा योग्य फोटोदेखील शेअर केला आहे”.

    त्याच ट्वीटवर अक्षय कुमारने रिप्लाय देत लिहिले, “मेजर जॉली ही गोष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद. चित्रपटाची शूटिंग करताना या गोष्टीची काळजी घेतली जाईल. गोरखा चित्रपटाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. अक्षय कुमारचे लवकरच सूर्यवंशी आणि अतरंगी रे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर गोरखा सिनेमात दिसणार आहे.