akshay kumar

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटातील अक्षय कुमार व टायगर श्रॉफ यांच्या एका अ‍ॅक्शन सीनचं शूटिंग सुरू होतं. याचदरम्यान स्टंट करताना अक्षय कुमारला दुखापत झाली. अक्षयच्या गुडघ्याला दुखापत झाली. मात्र त्याच्यावर लगेचच उपचार करण्यात आले. स्कॉटलँडमधील चित्रपटाचं शूटिंग वेळेत पूर्ण करण्यासाठी अक्षयने दुखापत झालेली असतानाही शूटिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्या सीन्सवर 15 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं शूटिंग स्कॉटलँडमध्ये सुरू आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. अ‍ॅक्शन सीन्स शूट करत असताना अक्षय जखमी(Akshay Kumar Shooting After Knee Injury) झाला होता. त्या अपघातानंतर चित्रपटाचे शूटिंग काही काळासाठी थांबवण्यात आलं होतं. मात्र, अक्षयने पुन्हा शुटिंगला सुरुवात केली आहे. पायाला गंभीर दुखापत होऊनही अक्षय चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अक्षय कुमारचा यासंदर्भातला एक व्हिडिओ समोर आला आहे.

15 कोटींचा खर्च वाया जाऊ नये म्हणून आटापिटा
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटातील अक्षय कुमार व टायगर श्रॉफ यांच्या एका अ‍ॅक्शन सीनचं शूटिंग सुरू होतं. याचदरम्यान स्टंट करताना अक्षय कुमारला दुखापत झाली. अक्षयच्या गुडघ्याला दुखापत झाली. मात्र त्याच्यावर लगेचच उपचार करण्यात आले. स्कॉटलँडमधील चित्रपटाचं शूटिंग वेळेत पूर्ण करण्यासाठी अक्षयने दुखापत झालेली असतानाही शूटिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्या सीन्सवर 15 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे अक्षयने आराम न करता शूटिंग सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.

मीडिया रिपोर्टनुसार, अक्षयने दुखापत झाल्यानंतरही शूटिंग बंद न करता चित्रपटातील पुढचे सीन्स चित्रीत केल्याची माहिती मिळाली आहे. गंभीर दुखापत नसल्यामुळे अक्षयने शूटिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. अक्षयच्या दुखापतीमुळे चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्सचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. सध्या अक्षय कुमारचे चित्रपटातील अन्य सीन्स शूट करण्यात येत आहेत. अक्षय कुमारचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्याच्या डेडीकेशनचं कौतुक केलं आहे. काहींनी तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे.