akshay kumar

'आज अतरंगी रे या चित्रपटाच्या शूटींगचा शेवटचा दिवस होता. आनंद एल राय यांनी क्रिएट केलेल्या जादूचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. इतका वेळ मी दवडू शकत नाही.

  बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटाचं शूटींग पूर्ण झालं आहे. याबाबतची माहिती स्वत: अक्षय कुमारने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. त्याचबरोबर जादूगाराच्या वेशात बदामच्या बादशाह चाहत्यांना दाखवला आहे. काळी टोपी आणि लाल रंगाच्या गोल्डन डिझाईन असलेला सूट अक्षयने परिधान केला आहे. फोटो शेअर करताना त्याने त्याखाली भावुक पोस्टही लिहिली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

  ‘आज अतरंगी रे या चित्रपटाच्या शूटींगचा शेवटचा दिवस होता. आनंद एल राय यांनी क्रिएट केलेल्या जादूचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. इतका वेळ मी दवडू शकत नाही. माझ्यासोबत काम केलेल्या सारा अली खान आणि धनुषचा मी आभारी आहे. त्यांनी मला चांगल्या चित्रपटाचं भाग बनवलं’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

  सारा अली खान आणि धनुषसोबत अक्षय कुमार पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सारा अली खान आणि धनुषही लीड रोलमध्ये आहे. हा चित्रपट येत्या ६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर चालणार का हे येत्या काळातच स्पष्ट होईल