akshay kumar

"सामाजिक विषयांवर सिनेमा करायला मला आवडतं. हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकत नसले तरी मनाला समाधान मिळतं" असं अक्षय म्हणाला.

    टॉयलेट एक प्रेमकथा’ आणि ‘पॅडमॅन’ सारखे सामाजिक संदेश देणारे सिनेमे केले आहेत. आता अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एका सामाजिक संदेश देणाऱ्या सिनेमात दिसणार आहे. खिलाडी कुमारने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे.रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’च्या मंचावर त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. या सिनेमावर खिलाडी कुमारचं काम सुरू असून पुढील वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

    लैंगिक शिक्षण या विषयावर सिनेमा बनवण्याबाबत विचारला असता अक्षय म्हणाला,”लैंगिक शिक्षण हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. पण तरीदेखील या विषयाची दखल घेतली जात नाही. जगातील प्रत्येक शाळेत हा विषय शिकवला गेला पाहिजे असं मला वाटतं. पण मी माझ्यापद्धतीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त हा सिनेमा प्रदर्शित व्हायला थोडा वेळ लागेल. पण हा माझ्या आतापर्यंतच्या सिनेमांपैकी एक सर्वोत्कृ्ष्ट सिनेमा असेल”.

    तसेच “सामाजिक विषयांवर सिनेमा करायला आवडत असून. हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकत नसले तरी मनाला समाधान मिळत असं मत त्यानं व्यक्त केलं.